चार लाख शेतकऱ्यांसाठी ३४३ कोटी रुपयांचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 01:28 AM2020-01-03T01:28:37+5:302020-01-03T01:29:21+5:30

जवळपास ३४३ कोटी रूपये प्राप्त झाले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली.

4 crore subsidy for four lakh farmers | चार लाख शेतकऱ्यांसाठी ३४३ कोटी रुपयांचे अनुदान

चार लाख शेतकऱ्यांसाठी ३४३ कोटी रुपयांचे अनुदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यात वादळी वारे तसेच परतीच्या पावसामुळे खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पंचनाम्या नंतर जालना जिल्ह्यात जवळपास ४०० कोटी रूपये मदतीसाठी हवे होते. तशी मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली होती. त्यानुसार आतापर्यंत जवळपास ३४३ कोटी रूपये प्राप्त झाले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली.
जालना जिल्ह्यात प्रारंभी पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. मध्यंतरी थोडा- फार पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्या शेतकऱ्यांनी उरकल्या होत्या. या पेरण्या केल्यानंतर पिकांची वाढही यावेळी चांगली होती. त्यात सोयाबीन तसेच मूग इ. पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तर या परतीच्या पावसामुळे डाळिंब, द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचेही पंचनामे करण्यात आले. यावेळी मोसंबीलाही या वादळी वारे आणि परतीच्या पावसाचा फटका बसल्याचे दिसून आले.
हे सर्व नुकसान झाल्याने शेकतरी हवालदिल झाला होता. शासनाने त्वरित मदत द्यावी यासाठी केंद्र सरकारने त्यांचे एक पथकही दौºयावर पाठविले होते. या पथकाचा अहवाल तसेच राज्यातील कृषी तसेच महसूल विभागाने केलेले संयुक्त पंचनाम्यांच्या आधारे जालना जिल्ह्यात चारशे कोटी रूपयांचे अंदाजित नुकसान झाल्याचे पुढे आले होते.

Web Title: 4 crore subsidy for four lakh farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.