भर पावसाळ्यातही १०१ टँकर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 01:00 AM2019-08-19T01:00:40+5:302019-08-19T01:00:53+5:30

भर पावसाळ्यात आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातही तब्बल १०१ टँकरद्वारे ८९ गावे १८ वाड्यांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

3 tankers started during monsoon | भर पावसाळ्यातही १०१ टँकर सुरू

भर पावसाळ्यातही १०१ टँकर सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. परिणामी भर पावसाळ्यात आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातही तब्बल १०१ टँकरद्वारे ८९ गावे १८ वाड्यांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पावसाळ्याचा तिसरा महिना संपत आला असून, अद्यापही मोठा पाऊस न झाल्याने सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
सततच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्यांनाही पाण्याच्या प्रश्नाने ग्रासले आहे. यंदा मोठा पाऊस पडण्याची अपेक्षा जिल्हावासियांना होती. मराठवाडा वगळता राज्यात इतरत्र दमदार पाऊस झाला असून, पूर परिस्थितीमुळे सांगली, सातारा, कोल्हापूर भागात अतोनात नुकसान झाले आहे. या उलट जालना जिल्ह्यातील गावा-गावातील पाणीटंचाईचा प्रश्न आजही कायम आहे.
मध्यंतरी भोकरदन तालुक्याच्या अर्ध्या भागात दमदार पाऊस झाला. मात्र, अर्ध्याहून अधिक तालुक्यात आजही पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे. इतर तालुक्यांमधील पाण्याची परिस्थिती वेगळी नाही.
मे महिन्यात जिल्ह्यात ६०० वर टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात होता. मध्यंतरी झालेल्या पावसानंतर प्रशासनाकडून जवळपास ५०० टँकर बंद करण्यात आले आहेत. असे असले तरी बदनापूर, परतूर, अंबड व घनसावंगी तालुक्यातील ८९ गावे आणि १८ वाड्यांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यात बदनापूर तालुक्यातील १० गावांना ११ टँकरद्वारे, परतूर तालुक्यातील ११ गावांना ११ टँकरद्वारे अंबड तालुक्यातील ४६ गावे, ११ वाड्यांना ५४ टँकरद्वारे तर घनसावंगी तालुक्यातील २२ गावे आणि ७ वाड्यांना २५ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दरम्यान, पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. आगामी एक महिन्यात दमदार पाऊस न झाल्यास पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
३३ गावांना अधिग्रहणाचा आधार
जिल्ह्यातील ३३ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर टँकर भरण्यासाठी ४२ अधिग्रहणे करण्यात आली आहेत. टँकर व गावांसाठी एकूण ७५ अधिग्रहणे जिल्ह्यात करण्यात आली आहेत. तर काही टँकर ज्या जलशुध्दकरण केंद्रात पाणी उपलब्ध आहे, तेथे भरण्यात येत आहेत.
एक लाख ९१ हजार नागरिकांना आधार
जालना जिल्ह्यातील ८९ गावे, १८ वाड्यांना १०१ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या ठिकाणच्या तब्बल १ लाख ९१ हजार ४४३ नागरिकांना टँकरच्या पाण्याचा आधार मिळाला आहे.
९७ खासगी टँकर
प्रशासनाकडून जिल्ह्यात १०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यातील ९७ टँकर खासगी असून, केवळ ४ टँकर शासकीय आहेत. या टँकरच्या २२५ खेपा मंजूर असून, प्रत्यक्षात १८९ फेºया झाल्या आहेत.

Web Title: 3 tankers started during monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.