जालन्यात काेरानाचा विस्फोट २५३ जणांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST2021-03-13T04:55:15+5:302021-03-13T04:55:15+5:30

जालना : जिल्ह्यात गुरूवारी तब्बल २५३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, आतापर्यंतचा हा सर्वांत जास्त आकडा असल्याचे वैद्यकीय ...

253 people infected with corona in Jalna | जालन्यात काेरानाचा विस्फोट २५३ जणांना कोरोनाची लागण

जालन्यात काेरानाचा विस्फोट २५३ जणांना कोरोनाची लागण

जालना : जिल्ह्यात गुरूवारी तब्बल २५३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, आतापर्यंतचा हा सर्वांत जास्त आकडा असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. यात एकट्या जालना शहरात १५० जणांना कोरोनाची लागण झाली असून, विवाह सोहळे तसेच अन्य गर्दीच्या कार्यक्रमांमुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे सरकारी आणि खासगी डॉक्टर कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊनही कोरेाना पॉझिटिव्ह येत असल्याचे चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे असून, त्यात जालना १४७, जालना तालुक्यातील आंतरवाला १, हिरवरारोषणगाव १, वडगाव वखारी १, चितळी-पुतळी ३, दहिफळ १, इंदेवाडी १, हिवर्डी १, निरखेडा १, नेरतांडा १, शहापूर १, वाघ्रुळ असे जालना शहर आणि तालुका मिळून १६० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मंठा शहर २, वाडी १, पांगरी १, मोसा १ असे मंठा तालुक्यात ५ रूग्ण आहेत. परतूर तालुक्यातील आष्टी १, धोनवाडी १, सातोना ८, उस्मानपूर १, वाटूरफाटा १ असे एकूण १२ रूग्ण आढळले आहेत. घनसावंगी शहर २, बेलगाव १, मंगूजळगाव १, मुरमा १, शिवनगाव १ अशी एकूण सहाजणांना लागण झाली आहे. अंबड शहर २३, आंतरवाला दाही १, चिंचोली १, लालवाडी १, एकूण २६ तसेच बदनापूर शहर ४, असोला १, काजळा १, तुपेवाडी १, चितोडा १ अशी एकूण आठ जणांना लागण झाली आहे. जाफाराद शहर ७, दहेगाव १, ढोणखेडा १, पिपंळखुटा १, सातेफळ १, टेंभुर्णी १ असे एकूण सहा रूग्ण आहेत. भोकरदन शहर २, फत्तेपूर १, जळगाव सपकाळ २, जवखेडा १ असे एकूण सहा रूग्ण आहेत. अन्य जिल्ह्यांतील रुग्णांमध्ये बुलडाणा ११ आणि औरंगाबाद २, बीड येथील १ आणि परभणी येथील ३ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण २५३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर २४८ जण गुरूवारी कोरोनातून मुक्त झाले आहेत. आतापर्यंत कोराेनातून बरे झालेल्यांची संख्या १५ हजार ९६१ आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १७ हजार ६६९ जणांना कोरोेनाची लागण झाली आहे. गुरूवारी कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.

Web Title: 253 people infected with corona in Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.