शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये २,३२२ महिला कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:31 IST

जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये संपली होती. ४७५ पैकी २६ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली, तर ४७८ सदस्य बिनविरोध निवडून ...

जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये संपली होती. ४७५ पैकी २६ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली, तर ४७८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ४४६ ग्रामपंचायतींच्या ३,६९८ जागांसाठी मतदान झाले. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, १२,३३२ पैकी ४,१४४ उमेदवारांनी विजय मिळवला. यात २,३२२ महिला उमेदवार आहेत.

भोकरदन तालुक्यात सर्वाधिक महिला उमेदवार

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात सर्वाधिक ४६६ महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. त्यानंतर जालना तालुक्यात ४०८, बदनापूर २८४, जाफराबाद ९३, परतूर १७८, मंठा २३९, अंबड ३४९, तर घनसावंगी तालुक्यात ३०५ महिला उमेदवार निवडून आल्या आहेत.

मी प्रथमच ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहे. मतदारांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला निश्चितच येत्या पाच वर्षात न्याय देण्याचा प्रयत्न करीन. टेंभुर्णी गावात सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी कुठेही स्वच्छतागृह उपलब्ध नाही. प्राधान्यक्रमाने मी महिलांच्या आरोग्याशी निगडित हा प्रश्न सर्वप्रथम सोडविण्यास प्राधान्य देईल. या सोबतच गावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करेल.

सुमन लक्ष्मण म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रथमच मी राजकारणात प्रवेश केला आहे. टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या १७ सदस्यांत आम्ही दहाजणी निवडून आल्याने निश्चितच जनतेने या सभागृहात महिलांना झुकते माप दिले आहे. जनतेच्या या कौलाचा आदर करीत महिलांच्या प्रश्नासोबतच गावातील स्वच्छतेचा प्रश्न सर्वप्रथम सोडविण्यास मी प्राधान्य देईल.

शिल्पा धनराज देशमुख, ग्रामपंचायत सदस्य

ग्रामपंचायत सदस्य म्हणून जनतेने मला दुसऱ्यांदा सेवेची संधी दिली आहे. मागील पंचवार्षिकला शेवटच्या कार्यकाळात एक वर्ष माझ्याकडे उपसरपंचपद होते. ग्रामसभेच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणासाठी आपण प्रयत्न केले. यापुढेही गणेशपूर व टेंभुर्णीच्या विकासात्मक कामासाठी सदैव तत्पर राहीन. पुरुषांनी महिलांच्या अधिकारावर गदा न आणता महिलांना स्वतंत्रपणे काम करण्याची संधी द्यावी.

उषा गणेश गाडेकर, ग्रामपंचायत सदस्य