आष्टीत दुकाने भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:39 IST2018-01-16T00:39:40+5:302018-01-16T00:39:48+5:30

बसस्थानक परिसरातल्या दोन दुकानांना रविवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

2 shops burned in fire | आष्टीत दुकाने भस्मसात

आष्टीत दुकाने भस्मसात

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : येथील बसस्थानक परिसरातल्या दोन दुकानांना रविवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या घटनेत दुकानातील कपडे व फर्निचर जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.
बसस्थानक परिसरात ज्ञानेश्वर दत्तात्रय बर्वे यांचे जेन्ट्स पार्लरचे दुकान आहे. या दुकानाला लागूनच हनुमान रामभाऊ गाडगे यांचे इलेक्ट्रिकलचे दुकान आहे. रविवारी मध्यरात्री या दोन्ही दुकानांना अचानक आग लागली. आग वाढत गेल्याने बर्वे यांच्या दुकनातील फर्निचर व इतर साहित्य खाक झाले. यात सुमारे दीड लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
गाडगे यांच्या इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या दुकानातील टीव्ही, एलईडी बल्ब व ड्रॉवरमधील रोख रक्कम अडीच हजार रुपये जळाल्याने सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी बाजूच्या बोअरवेलवरून पाणी आणून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आजूबाजूची काही दुकाने वाचली. आगीच्या या घटनेची आष्टी पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.

Web Title: 2 shops burned in fire