परतूरमध्ये १८ वर्षीय युवकाच्या हत्येने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 19:13 IST2019-08-31T19:13:21+5:302019-08-31T19:13:45+5:30
शहरात मागील दहा दिवसांमध्ये हत्येची दुसरी घटना आहे.

परतूरमध्ये १८ वर्षीय युवकाच्या हत्येने खळबळ
परतूर (जालना ) : शहराबाहेरील शारजाह मैदानावर एका युवकाची हत्या झाल्याची घटना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. कुंदन खंडेलवाल (१८ ) असे मृत युवकाचा नाव आहे. दरम्यान शहरात मागील दहा दिवसांमध्ये हत्येची दुसरी घटना आहे.
मोंढा भागात राहणारा कुंदन घनश्याम खंडेलवाल हा युवक जखमी अवस्थेत शहराबाहेरील शारजाह मैदानावर आढळून आला. त्याच्या डोक्याला गंभीर जखम होती. तसेच त्याची दुचाकी यावेळी तिथेच उभी होती. नागरिकांनी कुंदनला शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.