हायवाची बसला धडक १८ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 01:00 AM2018-12-30T01:00:20+5:302018-12-30T01:01:27+5:30

हायवाचालकाने एसटी महामंडळाच्या बसला जोराची धडक दिल्याने बसमधील १८ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी परतूर तालुक्यातील वाढोणा पाटीजवळ घडली.

18 passengers injured in truck- bus accident | हायवाची बसला धडक १८ प्रवासी जखमी

हायवाची बसला धडक १८ प्रवासी जखमी

Next

वाटूर फाटा : हायवाचालकाने एसटी महामंडळाच्या बसला जोराची धडक दिल्याने बसमधील १८ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी परतूर तालुक्यातील वाढोणा पाटीजवळ घडली.
परतूर आगाराची बस क्रमांक (एम.एच. २० बी.एल.२८६६ ) वाटूर वरुन परतूरला चालली होती. तर परतूर येथून हायवा क्रमांक (एम.एच.२० ए.जी. ९६९७) वाटूर कडे येत असलेल्या सुसाट हायवा चालकाचे हायवावरील नियंत्रण सुटल्याने चालकाच्या डाव्या बाजून जोराची धडक दिली. बेसावधपणे बसलेल्या बसमधील अठरा प्रवाशांना किरकाळ मार लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच वाटूर पोलिसांनी जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने वाटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारसाठी दाखल केले होते. यू.बी. वावरे, परतूर आगार व्यवस्थापकांनी भेट दिली.

Web Title: 18 passengers injured in truck- bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.