एकाच महिन्यात १०४ फरार आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST2021-09-07T04:36:32+5:302021-09-07T04:36:32+5:30
जालना : सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सदर बाजार पोलिसांनी एकाच महिन्यात विविध गुन्ह्यांत फरार ...

एकाच महिन्यात १०४ फरार आरोपी जेरबंद
जालना : सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सदर बाजार पोलिसांनी एकाच महिन्यात विविध गुन्ह्यांत फरार असलेल्या १०४ आरोपींना जेरबंद केले आहे.
येणाऱ्या काळात सण -उत्सव असल्याने या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना विविध गुन्ह्यांत फरार आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोनि. अनिरुद्ध नांदेडकर यांनी विविध पथके तयार करून दोन महिन्यांत विविध गुन्ह्यांत फरार असलेल्या तब्बल १०४ आरोपींना अटक केली. यात उत्तम नामदेव पोपळघट (रा. काजळा, ता बदनापूर), जलिंधर वामन वाघमारे (रा. मंठा), मोहन बाबासाहेब बाहेकर (रा. मंठा), संजय अभिमन्यू पोलास (रा.कहैयानगर), राम अग्रवाल (रा. साईनाथ नगर ), रमेश उत्तम चाकलवार (रा. गांधीनगर जालना), विजय गणेश गौमतीवाले (रा. कालीकुर्ती), शेषराव धेडीबा देवगडे (रा. चिंचोली ता. घनसावंगी), विशाल जगन पवार (रा. मांगवाडा जवळ कैकाडी मोहल्ला), कैलास छागन पाचगे (रा. गांधीनगर), बजरंग इंदर भुरेवाल (रा कालीकुर्ती), मजहर शे.बशीर (रा.जालना) आदी १०४ आरोपींची नावे आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. अनिरुद्ध नांदेडकर, गुन्हे शोध पथकप्रमुख पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार, पोउपनि. वाघ, रामप्रसाद रंगे, सुभाष पवार, समाधान तेलंग्रे, धनाजी कावळे, रामेश्वर जाधव, सोमनाथ उबाळे, योगेश पठाडे, दिपक घुगे, महिला पोलीस अंमलदार, सुमित्रा अंभोरे यांनी केली आहे.