१० उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:56 IST2019-04-04T00:55:53+5:302019-04-04T00:56:24+5:30
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०१९ च्या अनुषंगाने जालना लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी १० उमेदवारांनी १३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

१० उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०१९ च्या अनुषंगाने जालना लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी १० उमेदवारांनी १३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.
नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये निर्मला रावसाहेब दानवे (भाजपा), दानवे रावसाहेब दादाराव (भाजपा), अनिता लालचंद खंदाडे (अपक्ष) या उमेदवारांनी प्रत्येकी दोन नामनिर्देशनपत्र तर किशोर उद्धव खंडागळे (अपक्ष), रतन आसाराम लांडगे (अपक्ष), पठाण सरफराज बाबाखाँ (अपक्ष), गणेश शंकर चांदोडे (अपक्ष), विशाल कडूबा पाखरे (राष्ट्रवादी भीमसेना (पुरस्कृत), युनूस अहमद शेख (आंबेडकर नॅशनल काँग्रेस), मुजाहिद अब्दुल बारी सिद्दीकी (अपक्ष) या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले असून, आतापर्यंत २९ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.
आज शेवटचा दिवस
जालना लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज करण्यासाठी गुरूवारी शेवटचा दिवस असून, इच्छुक उमेदवारांना सकाळी ११ ते ३ या वेळेत अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रीया २८ मार्चपासून सुरू झाली होती. बुधवारपर्यंत २९ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली.