"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 16:43 IST2025-10-20T16:43:17+5:302025-10-20T16:43:50+5:30
गेल्या शुक्रवारी युक्रेनियन अध्यक्ष आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या बैठकीनंतर, हे विधान आले आहे.

"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अद्यापही सुरूच आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संघर्ष संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याचवेळी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. रशियासोबत सुरू असलेले युद्ध संपवण्याची ‘योग्य वेळ’ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, त्यांनी आपल्या मित्रदेशांना मॉस्कोवर कूटनीतिक दबाव वाढवण्याचे आवाहनही केले आहे. सोमवारी एक्सवर एक पोस्ट करत झेलेन्स्की यांनी सांगितले की, आपण फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी अलीकडील घडामोडी आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या कूटनीतिक प्रयत्नांवर चर्चा केली.
आपल्या पोस्टमध्ये झेलेन्स्की यांनी लिहिले, "मी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी बोललो. आता युद्ध संपवण्याची योग्य वेळ आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक संधीचा संपूर्ण उपयोग करत रशियावर योग्य दबाव निर्माण करणे आवश्यक आहे. युद्ध सुरू करणाऱ्या पक्षावर दबाव हाच युद्धाच्या समाप्तीची खरी चावी आहे. इमॅन्युएल आणि मी सर्व विद्यमान कूटनीतिक (राजनैतिक) पैलूंवर, तसेच भागीदार देशांशी अलीकडील संपर्कांवर विचारविनिमय केला. समर्थनासाठी मी कृतज्ञ आहे. आम्ही लवकरच भेटणार आहोत.
I spoke with President of France @EmmanuelMacron. Now is the right moment to push the situation toward ending the war, and the most important thing is to fully seize every opportunity and apply the right kind of pressure on Russia. Pressuring the one who started the war is the…
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) October 20, 2025
गेल्या शुक्रवारी युक्रेनियन अध्यक्ष आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या बैठकीनंतर, हे विधान आले आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या चर्चेत आपण दोन्ही बाजूंना युद्धबंदीसाठी सहमती दर्शविण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "माझा मुख्य उद्देश लोकांचा जीव वाचवणे आणि रोज होणारे हजारो मृत्यूं रोखणे आहे."