शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 15:38 IST

पाकिस्तानात गेलेला भारताचा मोस्ट वॉन्टेड झाकीर नाईक एका पश्तून तरुणीच्या प्रश्नावर जबरदस्त भडकला. एवढेच नाही, तर संबंधित तरुणीचा हा प्रश्न इस्लामवर आरोप असल्याचे म्हणत, झाकीरने तिला माफीदेखील मांगायला सांगितले.

धार्मिक कार्यक्रमांसाठी पाकिस्तानात गेलेला भारताचा मोस्ट वॉन्टेड झाकीर नाईक एका पश्तून तरुणीच्या प्रश्नावर जबरदस्त भडकला. एवढेच नाही, तर संबंधित तरुणीचा हा प्रश्न इस्लामवर आरोप असल्याचे म्हणत, झाकीरने तिला माफीदेखील मांगायला सांगितले. झाकीर नाइक 28 ऑक्टोबरपर्यंत पाकिस्तान दौऱ्यावर आहे.

पाकिस्तानात एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान संबंधित तुरुणीने झाकीर नाइकला प्रश्न केला. तरुणीने विचारले, "मी ज्या भागातून येते, तिथील लोक स्वतःला कट्टर इस्लामिक म्हणवतात, मात्र, तेथे लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होतात. मुलींना घरातून बाहेर पडू दिले जात नाही."

आधी माफी मागा - झाकीर नाइकतरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाइक जबरदस्त भडकला अन् उत्तर देण्याऐवजी त्याने तिला माफी मागायला सांगितली, तो म्हणाला, "आपण चुकीचे बोलत आहात. मुस्लिम कधीही मुलांवर लैंगिक अत्याचार करू शकत नाही, आपण इस्लामवर आरोप करत आहात. आधी माफी मागा."

"लोक अत्यंत धार्मिक आहेत, पण..." -संबंधित तरुणी झाकीर नाइकला म्हणाली, "मी अशा भागातून येते, जेथे पश्तो बोलली जाते. मी ज्या भागातून येते तेथे पूर्णपणे इस्लामिक सोसायटी आहे. तेथील महिला कारण असल्याशिवाय घराबाहेरही पडत नाहीत. दर रीशुक्रवारी तब्लीगी जमातच्या लोकांचे बयानही होते. काही दिवसांपूर्वी तेथे एक मोठा तब्लीगी इज्तिमादेखील झाला. आमच्या भागातील लोक अत्यंत धार्मिक आहेत. मात्र काय कारण असू शकते की, तेथे ड्रग्ज अॅडिक्शन आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण (Peadophile), व्याज घेणे आदी वाईट गोष्टी सर्रासपणे चालत आहेत. तिथील समाज का विघटित होत आहे? मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना उलेमा का समजावत नाहीत?"

तरुणीच्या या प्रश्ननावर भडकत झाकीर नाईक म्हणाला, "आपण जो प्रश्न केला आहे, त्यात विरोधाभास आहे. कुठल्याही इस्लामिक वातावरणात पीडोफाइल होऊ शकत नाही. हे शक्य नाही. यामुळे चुकीच्या प्रश्ननाबद्दल आपल्याला माफी मागायला हवी. आपल्याला स्वीकारावे लागेल. आपण इस्लामवर आरोप करत आहात आणि माफी मागायलाही तयार नाही..." 

टॅग्स :Zakir Naikझाकीर नाईकPakistanपाकिस्तानMuslimमुस्लीमIslamइस्लाम