हजाराच्या माळेत उडवून दिला iPhone, बघा मग काय झालं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 20:41 IST2019-02-12T20:39:22+5:302019-02-12T20:41:17+5:30
स्मार्टफोन आता अनेकांच्या हातात पाहायला मिळतो. बऱ्याचदा स्मार्टफोन कसा वापरावा यासाठी मार्गदर्शन करणारे व्हिडीओ केले जातात.

हजाराच्या माळेत उडवून दिला iPhone, बघा मग काय झालं...
नवी दिल्ली- स्मार्टफोन आता अनेकांच्या हातात पाहायला मिळतो. बऱ्याचदा स्मार्टफोन कसा वापरावा यासाठी मार्गदर्शन करणारे व्हिडीओ केले जातात. परंतु काही स्मार्टफोन वापरकर्त्यांनी आयफोनचे भन्नाट व्हिडीओ तयार केले आहेत. ते पाहून तुम्हीही बुचकळ्यात पडाल. सोशल मीडियावर हे व्हिडीओ व्हायरल झाले असून, आपण अशा प्रकारचे कुठलेही प्रयोग करू नयेत.
सोशल मीडियावरचं प्लॅटफॉर्म असलेल्या यू ट्युबमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडीओ 1 हजार फटाक्यांच्या माळेसोबत iPhone X ठेवण्यात आला आहे आणि त्यानंतर ती फटाक्यांची माळ पेटवण्यात आली. हा प्रयोग करून फटाक्यांबरोबर आयफोन जळला तरी तो चालत होता. फटाक्यांबरोबर पेटलेला फोनही नंतर चालत असल्याचं पाहून सगळेच अचंबित झाले. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये चार वेगवेगळे आयफोन कोल्ड्रिंगच्या ग्लासात टाकल्यात आले. तेव्हा पाण्यातून बुडवून काढल्यानंतर आयफोन व्यवस्थित चालत असल्याचं निदर्शनास आलं. या आयफोनला एका कोल्ड्रिंग असलेल्या भांड्यात ठेवण्यात आलं. त्यानंतर ते भांडे फ्रीजमध्ये ठेवलं गेलं. त्यानंतरही ते आयफोन व्यवस्थित चालत होते.
जर एखाद्याचा फोन रेल्वेच्या ट्रॅकवर ठेवल्यास काय होईल, अशाच एका अवलियानं आयफोन रेल्वेच्या ट्रॅकवर ठेवला. ट्रेनखाली त्या आयफोनचा चक्काचूर झाला तरीही तो चालत होता. त्यामुळे सध्या या आयफोनचे व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.