"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 10:42 IST2025-07-16T10:40:18+5:302025-07-16T10:42:13+5:30
PM Modi Nato Secretary General: नाटोच्या प्रमुखांनी भारत, चीन आणि ब्राझीलला थेट धमकी दिली आहे. तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, असे नाटोचे महासचिव मार्क रुट यांनी म्हटले आहे.

"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
"ऐका, जर तुम्ही चीनचे राष्ट्राध्यक्ष असाल किंवा भारताचे पंतप्रधान वा ब्राझीलचे राष्ट्रपती आणि जर तुम्ही अजूनही रशियासोबत व्यापार करत असाल. त्यांचे तेल आणि गॅस खरेदी करत असाल, तर ऐका... जर मॉस्कोमध्ये बसलेला तो व्यक्ती (व्लादिमीर पुतीन) शांतता चर्चेला गांभीर्याने घेत नसेल, तर मी १०० टक्के सेकंडरी सेक्शन लावणार आहोत." हे जे विधान आहे, ते आहे नाटोचे महासचिव मार्क रुट यांचे. त्यांनी भारत, चीन आणि ब्राझील या तीन देशांना थेट धमकीच दिली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मार्क रुट जगातील बलशाली राष्ट्रांची संघटना असलेल्या नाटो संघटनेचे प्रमुख आहेत. रूट यांनी भारत, चीन आणि ब्राझीलला रशियासोबत व्यापार न करण्याची धमकी दिली आहे.
भारत, चीन, ब्राझीलला धमकी, काय घडले?
नाटोचे महासचिव मार्क रूट यांनी मंगळवारी हे धमकीचे विधान केले. जर ब्राझील, भारत आणि चीनने रशियासोबत व्यापार सुरूच ठेवला, तर त्यांच्यावर १०० टक्के सेकंडरी सेक्शन (प्रतिबंध) लावले जातील. या प्रतिबंधांचा खूपच जास्त फटका बसेल. हे प्रतिबंध अमेरिकेकडून या देशावर लावले जातील, असे ते म्हणाले.
मार्क रुट यांनी म्हटले आहे की, या देशांनी पुतीन यांच्यावर रशिया-युक्रेन युद्ध शस्त्रसंधी करण्यासाठी दबाव टाकावा.
"या तीन देशांसाठी माझे आवाहन आहे की, जर तुम्ही बीजिंग, दिल्लीमध्ये राहता किंवा ब्राझीलचे राष्ट्रपती आहात. तर तुम्ही याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण याचा तुम्हाला जास्त फटका बसू शकतो", असे रुट म्हणाले आहेत.
"तुम्ही व्लादिमीर पुतीन यांना कॉल करा आणि त्यांना सांगा की, शांतता चर्चा गांभीर्याने घ्यावी लागेल. अन्यथा याचा ब्राझील, भारत आणि चीनवर व्यापक स्वरुपात गंभीर परिणाम होईल", असा धमकी वजा विधान रुट यांनी केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनीही दिलीये धमकी, पण...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला शस्त्रास्त्र देण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी त्यांनी अशी धमकीही दिली की, ५० दिवसांच्या आत जर शस्त्रसंधीवर सहमती झाली नाही, तर रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर १०० टक्के टॅरिफ लावू. पण, ट्रम्प यांनी कोणत्याही देशाचे नाव घेतलेले नव्हते. नाटोच्या प्रमुखांनी मात्र थेट नाव घेऊन धमकी दिली आहे.