"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 09:01 IST2025-05-01T08:58:39+5:302025-05-01T09:01:22+5:30
America Iran Latest News: इराण आणि अमेरिका यांच्यात बिनसताना दिसत आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी इराणला तसा इशाराच दिला आहे.

"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
Iran America Latest News: अमेरिकेचे सरंक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी इराणला इशारा दिला आहे. हेगसेथ यांनी एका ठिकाणी बोलताना म्हटलं आहे की, इराणकडून हूती बंडखोरांना जे विघातक समर्थन आणि मदत दिली जात आहे. त्याची सगळी माहिती अमेरिकेला आहे. याचे परिणाम इराणला भोगावे लागतील.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांचे हे विधान अशावेळी आले आहे, जेव्हा लाल समुद्राच्या हद्दीत हूती बंडखोरांकडून व्यावसायिक जहाजांवर हल्ले केले जात आहे. अमेरिकेचा असा दावा आहे की, या हल्ल्यांमागे इराण आहे. त्यांची काहीतरी रणनीती आहे आणि त्यांचेच सैन्य हूती बंडखोरांना मदत करत आहे.
तुम्हाला इशारा दिला गेलाय, आता तयार रहा -अमेरिका
संरक्षण मंत्री हेगसेथ म्हणाले की, "अमेरिका आपल्या पद्धतीने ठरवेल की, केव्हा आणि कशी कारवाई करायची आहे. तुमच्याकडून (इराण) हूती बंडखोरांना जे विध्वंसक पाठबळ दिलं जात आहे. त्याची सगळी माहिती आम्हाला आहे."
वाचा >>पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
"आम्हाला माहिती आहे की, तुम्ही काय करत आहात. तुम्हाला हेही माहिती आहे की, अमेरिकेचे सैन्य काय करू शकते. तुम्हाला इशारा दिला गेला आहे. आता परिणाम भोगण्यासाठी तयार रहा", असा धमकी वजा इशारा हेगसेथ यांनी इराणला दिला आहे.
अमेरिकेने यापूर्वीही इराणला दिला होता इशारा
संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्या विधानाचे आंतरराष्ट्रीय राजकारणात वेगवेगळे अर्थ लावले जात आहे. कारण यापूर्वीही अमेरिकेने अनेकदा इराणला इशारा दिला आहे. इराणने या क्षेत्रात अस्थिरता निर्माण करणाऱ्या शक्तींना ताकद देणे बंद करावे, असे अमेरिकेने म्हटले होते. दुसरीकडे हूती बंडखोरांचा असा दावा आहे की, हा हल्ला अमेरिकेनेच केला आहे.
हुती बंडखोरांच्या गटाला इराणचे समर्थन आहे. त्यांनी उत्तर येमेनवर कब्जा केलेला आहे. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ लाल समुद्रात हूती बंडखोर व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळेच आता अमेरिका इराणविरोधात आक्रमक झाली आहे.