"हो... मी हुकूमशहा, जगाला...!"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या दावोसमधील विधानाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:30 IST2026-01-22T12:26:32+5:302026-01-22T12:30:19+5:30

ट्रम्प म्हणाले, आपले निर्णय कुठल्याही एका विशिष्ट विचारधारेवर आधारित नाहीत, व्यावहारिकतेवर अवलंबून आहेत. यामध्ये पुराणमतवादी किंवा उदारमतवादी असण्यासारखे काहीही नाही. माझे ९५ टक्के निर्णय केवळ कॉमन सेन्सवर आधारित असतात आणि तेच महत्त्वाचे आहे."

Yes I am a dictator Donald Trump's statement in Davos causes a stir | "हो... मी हुकूमशहा, जगाला...!"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या दावोसमधील विधानाने खळबळ

"हो... मी हुकूमशहा, जगाला...!"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या दावोसमधील विधानाने खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर, त्यांच्या आक्रमक शैलीमुळे आणि धोरणांत्मक निर्णयांमुळे जागतिक पातळीवर जोरदार टीका होत आहे. यातच, स्वित्झर्लंडमधील जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) बैठकीत त्यांनी स्वतःबद्दल एक धक्कादायक विधान केले आहे. व्हेनेझुएला आणि ग्रीनलँडसारख्या मुद्द्यांवरून आंतरराष्ट्रीय नेत्यांनी ट्रम्प यांचे वर्तन एखाद्या 'हुकूमशाह' सारखे असल्याचे म्हटले होते. या टीकेला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, "लोक म्हणतात की मी एक हुकूमशहा आहे. तर हो..., मी हुकूमशहा आहे, पण कधीकधी तुम्हाला हुकूमशहाची गरज असते."

विचारधारा नव्हे, तर 'कॉमन सेन्स'वर निर्णय घेतो -
ट्रम्प म्हणाले, आपले निर्णय कुठल्याही एका विशिष्ट विचारधारेवर आधारित नाहीत, व्यावहारिकतेवर अवलंबून आहेत. यामध्ये पुराणमतवादी किंवा उदारमतवादी असण्यासारखे काहीही नाही. माझे ९५ टक्के निर्णय केवळ कॉमन सेन्सवर आधारित असतात आणि तेच महत्त्वाचे आहे."

"लोकांना वाटले की मी... पण..." -
तत्पूर्वी दावोसमध्ये ट्रम्प यांनी मान्य केले की, त्यांच्या विधानांमुळे जगभरात तणाव निर्माण झाला. मात्र, त्यांच्या इराद्यांचा चुकीचा अर्थ काढला गेला. "लोकांना वाटले की, मी बलाचा वापर करेन, परंतु मला बलाचा वापर करण्याची गरज नाही. तो करायचाही नाही आणि मी करणारही नाही," असेही ट्रम्प म्हणाले.

दावोसमध्ये आणखी काय म्हणाले ट्रम्प? - 
आपल्या ७० मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांनी युरोपच्या आर्थिक स्थितीसंदर्भातही भाष्य केले. अमेरिकेत आर्थिक प्रगती होत आहे. तर युरोप चुकीच्या दिशेने जात आहे. असे ट्रम्प म्हणाले. ग्रीनलँड हा डेन्मार्कचा अर्धस्वायत्त प्रदेश असून तो अमेरिका, रशिया आणि चीन दरम्यान एका मोक्याच्या ठिकाणी आहे. अमेरिकेला ग्रीनलँड दुर्मिळ खनिजांसाठी नको, तर धोरणात्मक कारणांसाठी हवा आहे. 

 
 

Web Title : ट्रम्प का दावोस में बयान: "हाँ, मैं दुनिया के लिए तानाशाह हूँ!"

Web Summary : राष्ट्रपति ट्रम्प ने आलोचना का सामना करते हुए दावोस में खुद को जरूरत पड़ने पर तानाशाह बताया। उन्होंने जोर देकर कहा कि उनके निर्णय सामान्य ज्ञान पर आधारित हैं, विचारधारा पर नहीं। उन्होंने वैश्विक तनावों को संबोधित किया, बल की आवश्यकता पर जोर नहीं दिया, जबकि यूरोप के आर्थिक मार्ग की आलोचना की।

Web Title : Trump's Davos Statement: "Yes, I am a Dictator, to the World!"

Web Summary : President Trump, facing criticism, declared himself a dictator when needed at Davos. He stressed his decisions are based on common sense, not ideology. He addressed global tensions, emphasizing no force needed, while criticizing Europe's economic path.