'होय ही मीच आणि मी आनंदात आहे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 04:25 IST2018-08-06T04:04:04+5:302018-08-06T04:25:14+5:30

होय, ही मी आहे आणि सध्य खूप आनंदी आहे. मी आनंदी असल्याचे सांगते, तेव्हा ते माझ्याकडे विचित्र नजरेने बघतात.

'Yes and I am happy' | 'होय ही मीच आणि मी आनंदात आहे'

'होय ही मीच आणि मी आनंदात आहे'

न्यूयॉर्क : होय, ही मी आहे आणि सध्य खूप आनंदी आहे. मी आनंदी असल्याचे सांगते, तेव्हा ते माझ्याकडे विचित्र नजरेने बघतात. आयुष्याचा प्रत्येक क्षण मी मनमुराद जगते आणि प्रत्येक क्षण सेलिब्रेट करण्याची संधी शोधत असते, अशी भावूक पोस्ट बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने फ्रेन्डशिप डेच्या निमित्ताने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केली.
सध्या सोनाली हाय ग्रेड कॅन्सरशी लढा देत आहे. सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट करत आपल्या मैत्रिणींसोबतचे नाते सर्वांसमोर आणले. या पोस्टमध्ये तिने दोन मैत्रिणींसोबतचा फोटोही शेअर केला. यातील एक हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुझान खान आणि गायत्री आबेरॉय आहे.
सोनाली लिहिते, हो, सध्या मी वेदनेतून जातेय. पण आता मला जे आवडते, तेच मी करते, ज्यांच्यावर प्रेम करते, त्यांच्यासोबत वेळ घालवते.
मी खूप नशिबवान आहे की, माझे मित्र त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून मला भेटायला येतात. मला कॉल करतात. मी एकटी नाही, याची जाणीव मला करून देतात. मला इतके प्रेम दिल्याबद्दल आभाऱ़़. काही दिवसांपूर्वी सोनालीने मुलगा रणवीरसोबतचा फोटो शेअर करत, एक इमोशनल पोस्ट
लिहिली होती.

Web Title: 'Yes and I am happy'