Yemen's separatist attack on Saudi airport; 1 killed, 21 injured | सौदीच्या विमानतळावर येमेनच्या फुटीरवाद्यांचा हल्ला; 1 ठार, 21 जखमी
सौदीच्या विमानतळावर येमेनच्या फुटीरवाद्यांचा हल्ला; 1 ठार, 21 जखमी

रियाद : सौदीच्या आभा आंतरराष्ट्रीय विमानतळावर येमेनच्या हौथी फुटीरतावाद्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात एका सिरियाच्या नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर 21 जण जखमी झाले आहेत. संयुक्त अरब अमिरात, बहारिन, कुवेत आणि इस्त्रायलने या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. 


अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्ल्यामध्ये 18 गाड्यांना नुकसान झाले आहे. विमानतळावर झालेल्या हल्ल्यामधील जखमींमध्ये सौदी अरब, भारत, इस्त्रायल आणि बांग्लादेशच्या नागरिकांचा समावेश आहे. जखमींमध्ये तीन महिला आणि दोन लहान मुलांचाही समावेश आहे. या सर्वांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. 


अरब संघटनेचे प्रवक्ते कर्नल तुर्क अल मलिकी यांनी सांगितले की विमानतळावर सध्या विमानोड्डाणे सुरू झाली असून हल्ल्यानंतर एका तासासाठी विमानतळ बंद ठेवण्यात आला होता. 


यापूर्वी 12 जूनलाही एका क्रूज मिसाईलद्वारे विमानतळावर हल्ला करण्यात आला होता. हे मिसाईल प्रवेश हॉलवर जाून आदळले होते, यामध्ये 26 जण जखमी झाले होते. 


Web Title: Yemen's separatist attack on Saudi airport; 1 killed, 21 injured
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.