शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अबब! ट्रम्प, नेतन्याहूंपेक्षा खूप श्रीमंत होते खामेनेई; आकडा पाहून भले भले छोटे वाटू लागतील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 06:05 IST

किती होती त्यांच्याकडे संपत्ती? आणि या अवाढव्य संपत्तीचा वारस आता कोण असेल? ज्या अमेरिका आणि इस्रायलच्या सर्वोच्च नेत्यांनी म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणचं कंबरडं मोडण्याचा चंग बांधला आणि ज्यांच्या पुढाकारातून खामेनेई यांचा मृत्यू झाला, त्यांच्यापेक्षाही खामेनेई यांची संपत्ती कितीतरी पटींनी अधिक होती.

इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आणि इराण पेटून उठलं. कधीकाळी तुरुंगात छळ सहन केलेले खामेनेई १९८९ मध्ये इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवडले गेले होते आणि तब्बल साडेतीन दशकांहून अधिक काळ त्यांनी इराणवर एकछत्री राज्य केलं. या काळात त्यांची संपत्तीही प्रचंड वाढली. 

किती होती त्यांच्याकडे संपत्ती? आणि या अवाढव्य संपत्तीचा वारस आता कोण असेल? ज्या अमेरिका आणि इस्रायलच्या सर्वोच्च नेत्यांनी म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणचं कंबरडं मोडण्याचा चंग बांधला आणि ज्यांच्या पुढाकारातून खामेनेई यांचा मृत्यू झाला, त्यांच्यापेक्षाही खामेनेई यांची संपत्ती कितीतरी पटींनी अधिक होती.काही अहवालांनुसार खामेनेई तब्बल २०० अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे मालक होते. २०१३ मधील रॉयटर्सच्या तपास अहवालात सांगण्यात आलं होतं की, खामेनेईंच्या नियंत्रणाखालील ‘एक्झेक्युशन ऑफ इमाम खामेनीज ऑर्डर’ (सेताद)कडे किमान ९५ अब्ज डॉलर्सची मालमत्ता होती. नंतर काही अमेरिकी अधिकाऱ्यांनी आणि माध्यमांनी अंदाज व्यक्त केला की, खामेनेई ज्या आर्थिक साम्राज्यावर नियंत्रण ठेवत होते, त्याची किंमत २०० अब्ज डॉलर्सपर्यंत असू शकते. मात्र, ही त्यांची वैयक्तिक संपत्ती नसून त्यांच्या नियंत्रणाखालील नेटवर्कची अंदाजित किंमत मानली जाते. 

बीबीएन टाइम्स आणि नेटवर्थविषयक काही इतर संकेतस्थळांनी त्यांची वैयक्तिक संपत्ती तुलनेनं कमी सांगितली असली, तरी ‘सेताद’च्या माध्यमातून त्यांचं नियंत्रण २०० अब्ज डॉलर्सपर्यंत असल्याचं म्हटलं होतं. सेतादसारख्या संस्थांद्वारे खामेनेई मोठं आर्थिक साम्राज्य व्यवस्थापित करत होते. फोर्ब्जच्या सप्टेंबर २०२५ च्या अहवालानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती ७.३ अब्ज डॉलर्स इतकी होती, जी २०२४ मध्ये सुमारे ३.९ अब्ज डॉलर्स होती. ‘सेलिब्रिटी नेटवर्थ’नुसार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची संपत्ती सुमारे १३ दशलक्ष डॉलर्स असल्याचं सांगितलं जातं. या दोघांच्या म्हणजेच ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्या तुलनेत खामेनेईंची संपत्ती खूपच जास्त असल्याचं दिसतं.

खामेनेईंच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून खामेनेईंचे पुत्र मोजतबा खामेनेई यांना इराणचा नवा सर्वोच्च नेता म्हणून पुढे केलं जाऊ शकतं. त्यांचीही संपत्ती कोट्यवधींच्या घरात आहे. इराणच्या संविधानानुसार सर्वोच्च नेत्याची निवड ८८ वरिष्ठ धार्मिक विद्वानांच्या परिषदेतून केली जाते. पण, ही बैठक इतक्यात शक्य नसल्याचं म्हटलं जातं. इराण इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, ‘इस्लामिक रिव्होल्युशनतरी गार्ड कॉर्प्स’ (आयआरजीसी) नव्या सर्वोच्च नेत्याच्या नियुक्तीसाठी जलद निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.यापूर्वी अमेरिकी थिंक टँक ‘कौन्सिल ऑफ रिलेशन्स’नं (सीएफआर) काही संभाव्य नावांची शक्यता व्यक्त केली होती. त्यात गार्डियन कौन्सिल आणि एक्स्पर्ट्स असेम्ब्लीचे सदस्य आयतुल्ला अलीरेजा अराफी, खामेनेईंचे निकटवर्तीय आणि सल्लागार मोहसेन कोमी, असेम्ब्ली ऑफ एक्स्पर्ट्सचे सदस्य आयतुल्ला मोहसेन अराकी, इराणच्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख गुलाम हुसैन मोहसेनी एजई आणि आयतुल्ला हशेम हुसेनी बुशहरी यांचा समावेश होता.

टॅग्स :Ayatollah Ali Khameneiअयातुल्ला अली खामेनेईIranइराणDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIsraelइस्रायलBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू