टोकियो : जगातील सर्वात वृद्ध पुरुष यसुतारो कोयदे यांचे मंगळवारी वयाच्या ११२ व्या वर्षी निधन झाले. जपानच्या नागोया शहरातील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राईट बंधूंनी पहिल्यांदा यशस्वी विमानोड्डाण करण्याच्या काही महिने आधी कोयदे यांचा जन्म झाला होता. न्यूमोनिया आणि हृदयगती थांबल्यामुळे कोयदे यांचे निधन झाले.१३ मार्च १९०३ रोजी त्यांचा जन्म झाला होता. दीर्घायुष्याचे रहस्य सांगताना एकदा कोयदे म्हणाले होते की, जास्त काम करायचे टाळून आनंदाने जीवन जगणे सर्वात चांगले. गेल्या आॅगस्टमध्ये जगातील सर्वात वृद्ध पुरुष म्हणून कोईदे यांचे नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले होते. (वृत्तसंस्था)
जगातील सर्वात वयोवृद्ध पुरुषाचे जपानमध्ये निधन
By admin | Updated: January 20, 2016 03:21 IST