World Bank Report :  जगातील 10 सर्वाधिक कर्जदार देशांत झाला पाकिस्तानचा समावेश, आता तर लोन मिळणंही होणार अवघड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 01:49 PM2021-10-13T13:49:30+5:302021-10-13T13:50:58+5:30

World bank report says Pakistan among the top 10 nations with largest external debt stocks 

World bank report says Pakistan among the top 10 nations with largest external debt stocks  | World Bank Report :  जगातील 10 सर्वाधिक कर्जदार देशांत झाला पाकिस्तानचा समावेश, आता तर लोन मिळणंही होणार अवघड

World Bank Report :  जगातील 10 सर्वाधिक कर्जदार देशांत झाला पाकिस्तानचा समावेश, आता तर लोन मिळणंही होणार अवघड

Next

जगातील 10 सर्वाधिक कर्जदार देशांच्या यादीत आता पाकिस्तानचाही (Pakistan) समावेश झाला आहे. जागतिक बँकेच्या (World Bank) अहवालानुसार, आता पाकिस्तान अशा 10 कर्जदार देशांच्या यादीत सामील झाला आहे, ज्यांच्यावर बाहेरच्या देशांचे सर्वाधिक कर्ज आहे. तो कोरोना महामारीनंतर Debt Service Suspension Initiative (DSSI) साठी पात्र झाला आहे. यामुळे आता पाकिस्तानला परदेशी कर्ज घेण्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात.

जागतिक बँकेने सोमवारी जारी केलेल्या 2022 मधील आंतरराष्ट्रीय कर्ज आकडेवारीचा हवाला देत, पाकिस्तानमधील प्रसिद्ध वृत्तपत्र 'द न्यूज इंटरनॅशनल'ने आपल्या अहवालात म्हटले आहे, की मोठ्या कर्जदारांसह DSSI अंतर्गत येणाऱ्या दोशांना मिळालेल्या कर्जाच्या दरातही मोठा फरक आहे. 

या देशांचा यादीत समावेश -
या 10 सर्वाधिक कर्ज असलेल्या देशांच्या यादीत, बांगलादेश, इथिओपिया, घाना, केनिया, मंगोलिया, अंगोला, नायजेरिया, पाकिस्तान, उझबेकिस्तान आणि झांबिया, या देशांचा समावेश आहे. या देशांकडे एकत्रित परकीय कर्ज 2020 च्या अखेरीस $ 509 अब्ज एवढे होते. 2019च्या तुलनेत हे 12 टक्क्यांनी अधिक आहे आणि ते DSSI अंतर्गत येणाऱ्या सर्व देशांच्या एकूण परकीय कर्जाच्या 59 टक्के होते.

DSSIच्या कक्षेत येणाऱ्या या देशांकडे 2020च्या अखेरपर्यंत गॅरंटी नसलेल्या परकीय कर्जाचे प्रमाण सुमारे 65 टक्के एवढे होते. या देशांना वेगवेगळ्या दराने परदेशी कर्ज देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी एक अहवाल आला होता, की पाकिस्तानवर जेवढे कर्ज आहे, त्यात इम्रान खान सरकारचा वाटा 40 टक्के एवढा आहे. 
 

Web Title: World bank report says Pakistan among the top 10 nations with largest external debt stocks 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app