कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 16:52 IST2025-11-02T16:52:21+5:302025-11-02T16:52:58+5:30
Russia News: खात्यात चुकून जमा झालेली भलीमोठी रक्कम एका कामगाराने बोनस समजून उडवल्याची अजब घटना रशियातील मान्सियस्क शहारातील एका कारखान्यात घडली आहे.

कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ
खात्यात चुकून जमा झालेली भलीमोठी रक्कम एका कामगाराने बोनस समजून उडवल्याची अजब घटना रशियातील मान्सियस्क शहारातील एका कारखान्यात घडली आहे. येथील कर्मचारी व्लादिमीर रिचागोव याच्या बँक खात्यामध्ये चुकून ७.१ दशलक्ष रुबल म्हणजेच सुमारे ८७ लाख रुपये एवडी रक्कम अचानक जमा झाली. बँकिंग अॅपवर नोटिफिकेशन पाहिले तेव्हा एवढी मोठी रक्कम पाहून तो अवाकच झाला. सुट्टीचा भत्ता म्हणून ४६ हजार रुपये म्हणजेच सुमारे ५८ हजार रुपये व्लादिमीर रिचागोव याला मिळायचे होते. मात्र त्यासोबतच खात्यात ७१,११२,३५४ रुपयांचा मेगा बोनसही आला.
दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्षाअखेरीस मोठी रक्कम जमा होणार असल्याची अफवा पसरलेली होती. त्यामुळे ही रक्कम म्हणजे आपल्याला मिळालेला बोनस आहे, असे व्लादिमीर याला वाटले. मात्र काही वेळातच अकाऊंटिंग विभागाकडून फोन येऊ लागले. त्यामुळे व्लादिमिर त्रस्त झाला. तुमच्या खात्यात जी रक्कम आली आहे ती परत करा, असे त्याला वारंवार सांगण्यात आले. मात्र त्यानंतर व्लादिमीर याने जे काही केले त्याबाबत ऐकून तुम्हााल धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
व्लादिमीर याने कुठेतरी वाचलेल्या कायद्याचा आधार घेत पैसे परत न करण्याचा निर्णय घेतला. खरंतर सॉफ्टवेअरच्या चुकीमुळे दुसऱ्या शाखेतील कामगारांचा पगार त्याच्या खात्यात जमा झाला होाता. मात्र ही रक्कम आपल्याला कंपनीच्या नावावर आली आहे. तसेच त्यावर पगार असा उल्लेख आहे असे सांगत त्याने ही रक्कम परत करण्यास नकार दिला.
एवढंच नाही तर ही रक्कम परत मिळवण्यासाठी कंपनीने दबाव वाढवला तेव्हा, व्लादिमीर याने एक नवी कार खरेदी केली. तसेच कुटुंबीयांसह दुसऱ्या शहरात स्थायिक झाला. मात्र नंतर कंपनीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याचं खातं गोठवलं. त्यानंतर प्रकरण कोर्टात गेले. तिथे पहिल्या सुनावणीत कोर्टाने कंपनीच्या बाजूने निकाल दिला. आता व्लादिमीर याने सर्वोच्च न्यायालयात अपील केलं आहे.