कमरेला बांधलेला पट्टा ट्रेनच्या दरवाजात अडकला; फरफटत गेलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 16:47 IST2021-09-16T16:47:06+5:302021-09-16T16:47:34+5:30
एमी एडम्स सोमवारी दुपारी ३.१६ मिनिटांनी सैन फ्रांसिस्कोच्या पॉवेल स्ट्रीट स्टेशनवर जाणाऱ्या बार्ट ट्रेनच्या अपघातात मृत्यूमुखी पडली.

कमरेला बांधलेला पट्टा ट्रेनच्या दरवाजात अडकला; फरफटत गेलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू
कॅलिफोर्निया – अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये सैन फ्रांसिस्को स्टेशनवर भीषण दुर्घटना घडली आहे. यात रेल्वे अपघात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महिलेने कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा कमरेला बांधला होता. हा पट्टा ट्रेनच्या दरवाजात अडकला त्यानंतर महिला पटरीवर ओढली गेली. मृत महिला ४१ वर्षीय सैन फ्रांसिस्को येथील राहणारी एमी एडम्स असं तिचं नाव आहे.
एमी एडम्स सोमवारी दुपारी ३.१६ मिनिटांनी सैन फ्रांसिस्कोच्या पॉवेल स्ट्रीट स्टेशनवर जाणाऱ्या बार्ट ट्रेनच्या अपघातात मृत्यूमुखी पडली. बार्टने त्यांच्या निवेदनात म्हटलंय की, एडम्स या त्यांच्या कुत्र्यासोबत प्लॅटफॉर्मवरून जात होत्या. ज्याचा पट्टा त्यांच्या कमरेला बांधला होता. त्या डबलिन ट्रेनमध्ये सवार झाल्या. डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, ट्रेनचा दरवाजा बंद होणार इतक्यात एमी एडम्स अचानक ट्रेनच्या बाहेर प्लॅटफॉर्मवर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा कुत्रा ट्रेनमध्ये अडकला. त्यानंतर ट्रेन प्लॅटफॉर्मवरून जायला निघाली तेव्हा एडम्स ट्रेनसोबत खेचली गेली.
या दुर्घटनेत कुत्रा ट्रेनमध्ये असल्याने तो वाचला मात्र कुत्र्याचा पट्टा कमरेला बांधला असल्याने धावत्या ट्रेनसोबत एडम्स पुढे ओढल्या गेल्या. तसेच ही एक दुर्देवी घटना आहे. आम्ही आमच्या सुरक्षा नियमांचे पालन केले होते असं प्रवक्ते एलिसिया ट्रॉस्ट यांनी सांगितले. बार्टचे मुख्य सुरक्षा अधिकारी सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. हा अपघात नेमका कसा झाला आणि रोखता आला असता का? यावर तपास सुरु आहे. बार्ट ट्रेनमधून पट्टा बांधलेल्या कुत्र्याला घेऊन प्रवास करण्याची परवानगी आहे.