शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

अमेरिकेपुढे सरेंडर करणार नाहीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 14:22 IST

Iran Israel War: इस्रायल करत असलेल्या तीव्र हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शरणागती पत्करण्याची अमेरिकेने केलेली मागणी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी धुडकावून लावली.

दुबई : इस्रायल करत असलेल्या तीव्र हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शरणागती पत्करण्याची अमेरिकेने केलेली मागणी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी धुडकावून लावली आहे. अमेरिकेने जर लष्करी हस्तक्षेप केला, तर त्या देशाची कधीही भरून येणार नाही इतकी प्रचंड हानी होईल, असा इशारा त्यांनी दिला. त्यांचे हे वक्तव्य रेकॉर्ड करून त्या व्हिडीओचे सरकारी प्रसारमाध्यमांतून प्रसारण करण्यात आले. खामेनी कुठे आहेत हे आम्हाला माहित आहे पण त्यांना सध्या ठार मारण्याचा आमचा विचार नाही असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. त्याला खामेनी  यांनी प्रत्युत्तर दिले. 

त्यांनी मंगळवारी सांगितले की, ट्रम्प यांची धमकी हास्यास्पद आहे. जे लोक इराण, त्या देशाचा इतिहास, तेथील जनता यांच्याबद्दल जाणतात ते कघीच धमकीची भाषा वापरणार नाहीत. इराणी जनता कधीही कोणाला शरण जात नाही. इस्रायलसोबतच्या संघर्षात अमेरिकेने हस्तक्षेप केला तर त्या देशाचे अपरिमित नुकसान होईल. इस्रायलने सुरू केलेल्या हल्ल्यानंतर खामेनी इराणमध्ये नेमके कोणत्या ठिकाणी आहेत याची माहिती गोपनीय राखण्यात आली आहे. त्यांच्या जारी झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या मागे इराणचा राष्ट्रध्वज तसेच त्यांच्या आधीचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचे छायाचित्र दिसते. दरम्यान, इराण आणि इस्रायलचे एकमेकांवर जोरदार हल्ले सुरूच आहेत. (वृत्तसंस्था)  

अडकलेल्या भारतीयांसाठी ‘ऑपरेशन सिंधू’ सुरूइराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंधू’ सुरू केले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. भारताने १७ जून रोजी उत्तर इराणमधून इराण आणि आर्मेनियामधील ११० विद्यार्थ्यांना बाहेर काढले आहे. ते एका विशेष विमानाने भारतात येत आहेत. इराणमध्ये १,५०० विद्यार्थ्यांसह १० हजार भारतीय अडकले आहेत. तेहरानमध्ये अडकलेले कोलकात्याचे साहसी गिर्यारोहक फाल्गुनी डे तब्बल ५०० किमीचा धोकादायक रस्ता पार करत मंगळवारी इराणच्या अस्तारा सीमेवर पोहोचले आहेत.

भारतीयांवर हल्लेइराणमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवर त्यांच्या वसतिगृहात झालेल्या हल्ल्यात काही जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. त्यासंदर्भात इराणचे परराष्ट्र खाते तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले.  क्षेपणास्त्रे इराणने इस्रायलवर डागली असून, शेकडो ड्रोनच्या माध्यमातून हल्ले चढविले आहेत. त्यात २४ इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला व शेकडो लोक जखमी झाले. रिव्होल्युशनरी गार्ड अकॅडमीवरही हल्ला करण्यात आला.

हल्ला करणार की नाही, हे फक्त मलाच माहिती: ट्रम्पअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याबाबत बुधवारी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मी हल्ला करू शकतो अन् कदाचित नाहीही. मी काय करणार आहे हे कोणालाच माहिती नाही. इराण खूप अडचणीत आहे. ते आता चर्चा करण्यासाठी तयार आहेत.

ट्रम्प जुनाट युद्धखोर: इराणकोणताही इराणी अधिकारी व्हाइट हाऊसच्या दरवाजापुढे झुकलेला नाही. ट्रम्प यांच्या खोटे बोलण्यापेक्षा आणखी वाईट गोष्ट म्हणजे त्यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याला बाहेर काढण्याची भित्रेपणाने दिलेली धमकी. इराण दबावाखाली चर्चा करत नाही, अशा दबावाखाली शांतता स्वीकारत नाही, आणि प्रसिद्धीसाठी प्रयत्न करत आहेत अशा जुनाट युद्धखोर व्यक्तीबरोबर आम्ही चर्चा करत नाही. 

टॅग्स :warयुद्धIranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाAir Indiaएअर इंडिया