बहिणींना भेटण्यासाठी बिकिनी किलर चार्ल्स शोभराज पुण्यात येणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 08:22 IST2022-12-26T08:22:02+5:302022-12-26T08:22:40+5:30

मला माझ्या आयुष्यात घडलेल्या घटनांवर पुस्तक लिहायचे आहे, अशी इच्छा चार्ल्स शोभराजने व्यक्त केली आहे.

will bikini killer charles sobhraj come to pune to meet his sister | बहिणींना भेटण्यासाठी बिकिनी किलर चार्ल्स शोभराज पुण्यात येणार? 

बहिणींना भेटण्यासाठी बिकिनी किलर चार्ल्स शोभराज पुण्यात येणार? 

काठमांडू : २४पेक्षा अधिक हत्या केल्याचा आरोप असलेल्या चार्ल्स शोभराजने तुरुंगातून सुटल्यानंतर भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला पुण्यातील बहिणींची भेट घ्यायची आहे. अटकेनंतर घेण्यात आलेल्या एका मुलाखतीत त्याने ही माहिती दिली होती.

शोभराजने म्हटले होते की, तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सर्वात प्रथम पॅरिसमधील मुलीची भेट घेतल्यानंतर मी भारतात येईन. पुण्यातील तीन बहिणींना भेटण्याची माझी इच्छा आहे, असे त्याने म्हटले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर ही मुलाखत प्रकाशित व्हावी या अटीखाली त्याने ही मुलाखत दिली होती. शोभराज अभिनेता रणदीप हुड्डा यांचा चाहता आहे.

पुढे काय करणार? 

- शोभराजने (वय ७८) एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, मी अनेक वर्षे जिवंत राहीन. स्वत:ला पुस्तक, लेखन आणि व्यवसायात व्यस्त ठेवणार आहे. 

- मला माझ्या आयुष्यात घडलेल्या घटनांवरही पुस्तक लिहायचे आहे. 

- मी शारीरिक आणि मानसिक व्यायाम करतो, त्यामुळेच माझे आरोग्य चांगले असल्याचा दावा त्याने केला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: will bikini killer charles sobhraj come to pune to meet his sister