अमेरिका NATO मधून बाहेर पडणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान, जगभरात खळबळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 17:36 IST2026-04-01T17:35:36+5:302026-04-01T17:36:10+5:30

अमेरिका नाटोमधून बाहेर पडल्यास रशियाला फायदा.

Will America leave NATO? Donald Trump's big statement, stirs up the world | अमेरिका NATO मधून बाहेर पडणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान, जगभरात खळबळ...

अमेरिका NATO मधून बाहेर पडणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान, जगभरात खळबळ...

America NATO: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो (NATO) या जगातील सर्वात मोठ्या सुरक्षा संघटनेतून अमेरिका बाहेर पडण्याबाबत गंभीर विचार सुरू असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

नाटोला ‘पेपर टायगर’ म्हटले

डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत सांगितले की, नाटो सदस्य देशांनी इराणविरोधातील अमेरिकेच्या मोहिमेत साथ दिली नाही, त्यामुळे अमेरिका या संघटनेत राहण्याचा पुनर्विचार करू शकते. ट्रम्प यांनी यावेळी नाटोला कागदी वाघ’ (कमकुवत संघटना) असे संबोधले. त्यांनी असेही म्हटले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनाही नाटोची ही कमजोरी माहिती आहे. अमेरिकेने नाटोमधून बाहेर पडावे का? याचा मी गंभीरपणे विचार करत आहे. जर आम्ही हा निर्णय घेतला, तर पुन्हा मागे फिरणार नाही, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

इराण प्रश्नावर मतभेद

अमेरिकेने नाटो सदस्य देशांना स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले होते, जेणेकरून त्या भागातील समुद्री मार्ग खुले ठेवता येतील. मात्र स्पेन, ब्रिटन, तुर्की, हंगेरी यांसह अनेक देशांनी अमेरिकेच्या भूमिकेला पाठिंबा दिला नाही. यामुळे ट्रम्प नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

नाटोच्या निधीवरून आधीही वाद

डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीही नाटोच्या निधीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यांचे म्हणणे आहे की, युरोपच्या सुरक्षेचा सर्वात मोठा खर्च अमेरिकेने का करावा? युरोपियन देशांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी अधिक निधी द्यावा.

अमेरिका बाहेर पडल्यास रशियाला फायदा

तज्ज्ञांच्या मते, जर अमेरिका नाटोमधून बाहेर पडली तर रशियासाठी ही मोठी रणनीतिक विजयाची बाब ठरेल. रशिया नेहमीच नाटोच्या विस्ताराला विरोध करत आला आहे. युक्रेन नाटोमध्ये सामील होण्याच्या शक्यतेमुळेच रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. अमेरिका नाटोमधून खरंच बाहेर पडला, तर युरोपची सुरक्षा व्यवस्था कमकुवत होऊ शकते. रशियाची ताकद वाढू शकते आणि जागतिक राजकीय समीकरण बदलू शकतात.

Web Title : ट्रंप नाटो से अमेरिका के बाहर निकलने पर विचार, विश्व स्तर पर चिंता।

Web Summary : डोनाल्ड ट्रम्प ईरान के खिलाफ अपर्याप्त समर्थन के कारण नाटो से अमेरिका को वापस लेने पर विचार कर रहे हैं। उन्होंने नाटो को 'पेपर टाइगर' कहा, जिससे फंडिंग और यूरोपीय सुरक्षा के बारे में चिंताएं बढ़ गईं। अमेरिका के बाहर निकलने से रूस को फायदा हो सकता है और यूरोपीय सुरक्षा अस्थिर हो सकती है, जिससे वैश्विक राजनीति बदल सकती है।

Web Title : Trump Weighs US Exit from NATO, Sparks Global Concerns.

Web Summary : Donald Trump considers withdrawing the US from NATO due to insufficient support against Iran. He labeled NATO a 'paper tiger,' echoing concerns about funding and European security. A US exit could benefit Russia and destabilize European security, altering global politics.