स्पेसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास NASA नं मनाई का केलीय, अंतराळात प्रेग्नेंट झाल्यास काय होईल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 12:07 IST2025-07-23T12:06:29+5:302025-07-23T12:07:18+5:30

नासाचे इंजिनिअर जोनाथन मिलर ज्यांनी ३० वर्षांहून अधिक काळ या एजन्सीसोबत काम केले आहे. त्यांनीही गुरुत्वाकर्षण नसलेल्या जागेत संबंध ठेवताना येणाऱ्या अडचणींवर भाष्य केले.

Why has NASA banned sexual intercourse in space? What happens if you get pregnant in space? | स्पेसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास NASA नं मनाई का केलीय, अंतराळात प्रेग्नेंट झाल्यास काय होईल?

स्पेसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास NASA नं मनाई का केलीय, अंतराळात प्रेग्नेंट झाल्यास काय होईल?

अंतराळात जाणे अनेकांसाठी रंजक असते परंतु ते कुठल्याही आव्हानापेक्षा कमी नाही. दीर्घकाळ तिथे राहणे आणि नवनवीन प्रयोग करणे मोठे चॅलेंज असते. अंतराळवीरांमध्ये पुरुषांसोबत महिलाही असतात. अंतराळात जाणाऱ्या महिला अंतराळवीरांबाबत नासाला एका गोष्टीची कायम चिंता असते, ती अंतराळात कुणी महिला गर्भवती राहू नये. कारण अंतराळात हे कृत्य बेजबाबदार मानले जाते. नासाने स्पेसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास बंदी केली आहे. मात्र अंतराळात असे घडलेच तर काय होऊ शकते असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. 

अंतराळात कुणी गर्भवती राहिल्यास काय होते नुकसान?

नासाने सांगितले की, कीटक आणि त्यांच्या जीवांवर अंतराळात केलेले प्रयोग यशस्वी ठरलेत परंतु कुठल्याही मोठ्या जनावरांवर हा प्रयोग केला नाही. परंतु शारीरिक आणि जैविक दृष्टीकोनातून अंतराळात गर्भधारणा होणे शक्य आहे. अंतराळात गुरुत्वाकर्षणाची कमी आणि रेडिएशनमुळे भ्रूणला नुकसान पोहचणे, ते मृत पावणे याची शक्यता आहे. वास्तवात याबाबत कुणीही जास्त माहिती देऊ शकत नाही की अंतराळात मानवी शरीरावर काय परिणाम होऊ शकतात. परंतु सामान्यपणे अंतराळ मानवी आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे स्पेस थेरेपी स्पेशालिस्टने सांगितले. 

गुरुत्वाकर्षणाच्या कमतरतेचा अंतराळवीरांवर विशेषतः दीर्घकाळाच्या मोहिमांवर खोलवर परिणाम होतो. माणूस स्नायूंच्या टिश्यू गमावू लागतात आणि त्यांच्या हाडांची ताकद कमी होते. गुरुत्वाकर्षणाच्या कमतरतेचा रक्ताभिसरणावरही नकारात्मक परिणाम होतो, परंतु त्याचा एक सकारात्मक पैलू देखील आहे, जो अंतराळात शारीरिक संबंधांना देखील मदत करू शकतो.

अंतराळात संबंध बनवणे खूप कठीण

दरम्यान, नासाचे इंजिनिअर जोनाथन मिलर ज्यांनी ३० वर्षांहून अधिक काळ या एजन्सीसोबत काम केले आहे. त्यांनीही गुरुत्वाकर्षण नसलेल्या जागेत संबंध ठेवताना येणाऱ्या अडचणींवर भाष्य केले. अंतराळात सेक्सला खूप जास्त महत्त्व दिले जाते, कारण वास्तवमध्ये ते करणे कठीण आहे आणि  एकट्याने राहणे अशक्य आहे. तेथे सेक्स पोझिशन्सची संख्या जवळजवळ तिप्पट होते आणि जोडप्यांना सतत त्यांचे पाय स्थिर ठेवण्याची आवश्यकता असते असं मिलर यांनी म्हटलं. 

Web Title: Why has NASA banned sexual intercourse in space? What happens if you get pregnant in space?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :NASAनासा