शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Bill Gates ना असं का वाटतं, मिसाईल नाही तर विषाणूनं लढलं जाईल पुढील युद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 2:36 PM

Bill Gates : यापूर्वीही बिल गेट्स यांनी मुलाखतीदरम्यान पुढील युद्ध हे विषाणूच्या मदतीनं लढलं जाऊ शकतं असं म्हटलं होतं.

ठळक मुद्देयापूर्वीही बिल गेट्स यांनी मुलाखतीदरम्यान पुढील युद्ध हे विषाणूच्या मदतीनं लढलं जाऊ शकतं असं म्हटलं होतं.आपल्या ब्लॉगमध्ये त्यांनी हवामान बदल हा विषाणूपेक्षाही घातक ठरू शकतं असं नमूद केलं आहे.

कोरोना महासाथीनं जगभरात हाहाकार माजवला होता. या महासाथीच्या पार्श्वभूमीवर काही काळासाठी संपूर्ण जगच थांबलं होतं. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी २०१५ मध्येच जगाला माहासाथीबद्दल इशारा दिला होत. त्यांचा त्यावेळचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. "पुढील युद्ध हे मिसाईल किंवा अण्विक शक्तीच्या आधारे नाही तर विषाणूच्या मदतीनं लढलं जाऊ शकतं," असं ते या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत. कोरोना महासाथीची भविष्यवाणी कोणीच करू शकलं नव्हतं. परंतु त्यावेळी बिल गेट्स यांनी केलेलं वक्तव्य आता काही प्रणामात योग्य ठरत आहे. यापूर्वी त्यांनी एका मुलाखतीत या महासाथीच्याबद्दल दु:ख व्यक्त केलं होतं. "केवळ एक विषाणूच संपूर्ण जगातील मानवजात नष्ट करण्यास प्रभावी ठरू शकतो," असं बिल गेट्स यापूर्वी म्हणाले होते. २०१५ मध्ये एका कार्यक्रमात त्यांनी एक विषाणू पसण्याबाबत भविष्यवाणी केली होती. तसंच याचा सामना करण्यासाठी जगानं तयार राहिलं पाहिजे असंही ते म्हणाले होते.  मिसाईल नाही तर विषाणूमुळे मृत्यू"जर कोणती अशी गोष्ट असेल जी पुढील काही दशकांत लोकांना मारेल तर ते युद्ध नाही तर तेजीनं पसरणारा विषाणू असेल. ते मिसाईल्स नाही विषाणू असतील," असं बिल गेट्स त्या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत. या व्हिडीओनं २०२० मध्ये सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. कोरोनाच्या महासाथीमुळे काही काळासाठी संपूर्ण जगच थांबलं होतं. केवळ २०१५ मध्येच नाही तर त्यानंतरही बिल गेट्स यांनी जगाला इशारा दिला होता. २०१७ मध्ये गेट्स यांनी रेडिट मध्ये आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना आपण जैविक उपकरणांपासून चिंताग्रस्त आहोत ज्याचा वापर बायोटेररिस्ट करू शकतात असं त्यांनी म्हटलं होतं.कोरोना महासाथीमुळे आतापर्यंत जगभरातील जवळपास २३ लाख लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. यापूर्वी त्यांनी तेजीनं परसणाऱ्या विषाणूमुळे एका वर्षातच ३ कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली होती. तसंच २०६० मध्ये हवामान बदल एका महासाथीप्रमाणेच धोकादायक होईल आणि तो विषाणूपेक्षा पाचपट अधिक धोकादायक असेल. यासाठीही आपल्याला तयार राहावं लागेल, असंही त्यांनी व्यक्त केलं होतं.

टॅग्स :Bill Gatesबिल गेटसcorona virusकोरोना वायरस बातम्याSocial Mediaसोशल मीडिया