शहरं
Join us  
Trending Stories
1
बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले?
2
मी पाकिस्तानी अन् मुस्लिम यामुळे मला...; गंभीर आरोप करत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा...
3
पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद
4
डिलिव्हरी बॉय बनून घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनीला लुटलं अन्... अंधेरीतील थरार!
5
एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!
6
"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
7
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
8
25 वर्षांचा विक्रम मोडला! एका कारने बदलले कंपनीचे नशीब; इतक्या गाड्यांची विक्री...
9
'IC-814' हायजॅक आणि मसूद अजहरची सुटका; त्या ७० तासांत नेमकं काय घडलं? कुख्यात दहशतवाद्याचा नवा दावा
10
ITC-Godfrey Phillips India Stocks: सरकारच्या एका निर्णयानं 'या' कंपन्यांना जोरदार झटका, दोन दिग्गज कंपन्यांचे शेअर्स आपटले; ६०००० कोटी बुडाले
11
विशेष लेखः भाजप - यश कळसाला, शिस्त तळाला! पक्षाची संस्कृती ढासळली तर...
12
फेब्रुवारीची ही संध्याकाळ आत्ताच बुक करून ठेवा...; आठपैकी सहा ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येणार, सातवी पृथ्वी, ज्यावर तुम्ही असणार...
13
UTS वर लोकलचा पास काढणं झालं बंद! तुमच्याकडे असलेल्या जुन्या पासचं काय होणार? वाचा सविस्तर...
14
निष्ठेला शिक्षा, सत्तेचा दर्प! इतर पक्षातील इच्छुकांना उमेदवारी द्या, हे कोणत्या सर्वेक्षणातून समोर आले?
15
Numerology: 'या' जन्मतारखांसाठी २०२६ ठरणार 'गोल्डन वर्ष'; पैसा, प्रसिद्धी आणि लक्झरीने भरणार झोळी
16
“मराठी महापौरच हवा असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही, ममदानी मुंबईत...”; कुणी केला दावा?
17
ट्रम्प यांचे हात निळे का पडले? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रकृतीचं गूढ वाढलं; खुद्द ट्रम्प यांनीच सांगितलं कारण!
18
ऑनलाईन खरेदी महागात पडली! शूज ऑर्डर केला, होल्डवर पडल्याचा फोन आला अन् ५५ हजार रुपये झटक्यात उडाले
19
तुमची पत्नी गृहिणी आहे आणि SIP चालवतेय, मग टॅक्स नक्की कोण भरणार? जाणून घ्या इन्कम टॅक्सचा महत्त्वाचा नियम
20
पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांचे हात निळे का पडले? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रकृतीचं गूढ वाढलं; खुद्द ट्रम्प यांनीच सांगितलं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 10:41 IST

ट्रम्प यांच्या उजव्या हाताच्या मागच्या बाजूला असलेले गडद निळे डाग अनेकदा कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्याविषयी गेल्या काही दिवसांपासून तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ट्रम्प यांच्या उजव्या हाताच्या मागच्या बाजूला असलेले गडद निळे डाग अनेकदा कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ७९ वर्षांचे ट्रम्प हे अमेरिकेचे सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष असल्याने त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, आता ट्रम्प यांनी स्वतः समोर येत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला असून, हे डाग कोणत्याही गंभीर आजारामुळे नसून एका गोळीमुळे असल्याचे स्पष्ट केले आहे.

एस्पिरिन गोळीचा 'हा' परिणाम 

'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी सांगितले की, ते दररोज रक्तातील गाठी रोखण्यासाठी आणि हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी 'एस्पिरिन'  घेतात. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, ही औषधे रक्त पातळ करतात, ज्यामुळे हाताला थोडासा जरी धक्का लागला, तरी तिथे निळी खूण पडते. "मला माझ्या हृदयामध्ये जाड रक्त नकोय, तर पातळ आणि शुद्ध रक्त हवे आहे. त्यामुळेच मी ही औषधे घेतो," असे ट्रम्प यांनी आपल्या खास शैलीत सांगितले.

मेकअप आणि मलमपट्टीचा वापर 

अनेकदा ट्रम्प यांचे हात मेकअप किंवा पट्ट्यांनी झाकलेले दिसतात. यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, "जेव्हा कधी माझ्या हाताला जोरात धक्का लागतो किंवा कोणी 'हाय-फाइव्ह' देते, तेव्हा तिथे निळी खूण पडते. अशा वेळी मी ती लपवण्यासाठी १० सेकंदात मेकअप लावतो." त्यांनी एका घटनेचा उल्लेख केला, जिथे अ‍ॅटर्नी जनरल पाम बाँडी यांच्या अंगठीचा धक्का लागल्याने त्यांच्या हातावर जखम झाली होती.

जाहीर कार्यक्रमात झोपल्याचा आरोप फेटाळला 

ट्रम्प यांच्यावर दुसरा मोठा आरोप असा होता की, ओव्हल ऑफिसमधील बैठकीत किंवा सार्वजनिक कार्यक्रमांत त्यांचे डोळे मिटलेले दिसतात. यावर ट्रम्प यांनी 'स्लीपी जो'ची आठवण करून देत म्हटले की, "मी कधीही जास्त झोपणारा माणूस नाही. कधीकधी मी फक्त डोळे बंद करून विश्रांती घेतो. ती एक विश्रांतीची पद्धत आहे, पण लोक त्यावेळी फोटो काढतात आणि मी झोपलो आहे असे भासवतात."

व्हाईट हाऊसचे अधिकृत निवेदन 

ट्रम्प यांच्या प्रकृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यावर व्हाईट हाऊसनेही अधिकृत माहिती दिली आहे. त्यांच्या डॉक्टरांच्या मते, ट्रम्प यांना 'क्रॉनिक वेनस इनसफिशिएंसी' नावाचा त्रास आहे, जो ७० वर्षांवरील व्यक्तींमध्ये सामान्य असतो. यामुळे पायांना थोडी सूज येते. मात्र, ट्रम्प यांची हृदय आणि मूत्रपिंडाची स्थिती उत्तम असून ते परफेक्ट फिट असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे. एकूणच, आपल्या आरोग्याबाबतच्या अफवांना ट्रम्प यांनी त्यांच्या नेहमीच्या आक्रमक आणि स्पष्टवक्तेपणाने उत्तर देऊन चर्चा शमवण्याचा प्रयत्न केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Why were Trump's hands blue? He reveals health mystery!

Web Summary : Trump addressed concerns about blue marks on his hands, attributing them to aspirin use for blood thinning. He dismissed claims of sleeping during meetings, explaining he was simply resting his eyes. The White House clarified he has a common condition, but is otherwise healthy.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका