शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

शी जिनपिंग यांच्या रडारवर का आलं मिंग परिवार? चीनने ११ सदस्यांना फासावर लटकवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 14:11 IST

म्यानमार आणि आसपासच्या देशात लाखो लोकांची तस्करी करून त्यांना जबरदस्तीने ऑनलाईन फसवणुकीचे काम दिले जाते. त्यात मोठ्या संख्येने चिनी नागरिकांचा समावेश आहे.

ऑनलाइन फसवणूक आणि बेकायदेशीर जुगार याविरोधात चीनने आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई केली आहे. चीनने म्यानमारच्या सीमेलगत असलेले स्कॅम सेंटर नेटवर्क चालवणाऱ्या कुख्यात मिंग कुटुंबातील ११ सदस्यांना फासावर लटकवले आहे. या लोकांवर हत्या, अवैध कब्जा, फसवणूक आणि जुगार अड्डे चालवण्यासारखे गंभीर गुन्हे होते. त्यात हे लोक दोषी आढळले. 

ही कारवाई फक्त शिक्षा नाही तर चीनकडून त्या सर्व फसवणूक करणाऱ्या टोळीला थेट इशाराच दिल्याचे बोलले जाते. ज्या टोळ्या दक्षिण पूर्व आशियात पसरल्या आहेत. माहितीनुसार, मिंग कुटुंब म्यानमारच्या उत्तरेकडील शान राज्यात लोकाइंग शहरात सक्रीय सर्वात ताकदवान माफिया कुटुंबापैकी एक होते. कधीकाळी अत्यंत गरीब असलेला हा परिसर मिंग कुटुंबासारख्या काही गॉडफादर टोळीमुळे कॅसिनो, रेड लाइट एरिया आणि फसवणूक करणाऱ्या टोळीचा अड्डा बनला. मिंग कुटुंबातील मुख्य मिंग श्वेचांग होता. जो क्राउचिंग टायगर व्हिला नावाने कुप्रसिद्ध स्कॅम सेंटर चालवायचा. सुरुवातीच्या काळात या कुटुंबाने जुगार आणि वेश्या व्यवसायातून कमाई केली परंतु कालांतराने त्यांनी ऑनलाइन लूट करणे याला मुख्य धंदा बनवला. 

२०२३ साली म्यानमारचे सैन्य आणि जातीय विद्रोही गटात संघर्ष वाढला होता. त्याच काळात मिलिशिया आघाडीने लोकाइंगवर कब्जा केला आणि मिंग कुटुंबातील अनेक सदस्यांना अटक करून चीनला सोपवले होते. त्यानंतर चीनमध्ये या सदस्यांविरोधात खटला सुरू होता. चीनच्या सर्वोच्च न्यायालयात मिंग कुटुंबाने २०१५ ते २०२३ या काळात १० अब्ज युआनहून अधिक अवैध कमाई केल्याचं सिद्ध झाले. या फसवणुकीत १४ चिनी नागरिकांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक गंभीर जखमी झाले होते. सप्टेंबर महिन्यात कोर्टाने मिंग कुटुंबातील ११ सदस्यांना मृत्यूची शिक्षा सुनावली, जी आता अंमलात आली आहे. त्याशिवाय कुटुंबातील २० हून अधिक सदस्यांना ५ वर्षापासून जन्मठेपेपर्यंत शिक्षा दिली आहे.

म्यानमार आणि आसपासच्या देशात लाखो लोकांची तस्करी करून त्यांना जबरदस्तीने ऑनलाईन फसवणुकीचे काम दिले जाते. त्यात मोठ्या संख्येने चिनी नागरिकांचा समावेश आहे. या स्कॅम सेंटर हिंसा सामान्य बाब आहे. मारहाण, छळ, विजेचा शॉकसारख्या क्रूरतेतून सुटका झालेल्या अनेक पीडितांना त्यांच्यावरील अत्याचाराची कहाणी सांगितली. परंतु चीनने मिंग कुटुंबाला संपवून कठोर संदेश दिला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : China Executes 11 Members of Notorious Ming Crime Family

Web Summary : China executed 11 members of the Ming family for online fraud and illegal gambling. The family ran scam centers near the Myanmar border, amassing over 10 billion yuan. They were also found guilty of murder and other crimes, sending a strong message to criminal gangs.
टॅग्स :chinaचीनfraudधोकेबाजी