किम जोंग उन यांच्यानंतर कोण? अखेर उत्तर कोरियाच्या वारसाचे गूढ उकलले; नव्या बॉसच्या नावाची हवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 17:43 IST2026-02-12T17:42:12+5:302026-02-12T17:43:14+5:30

दक्षिण कोरियाची गुप्तचर संस्था 'नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिस'ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराधिकारी नियुक्तीच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

Who will succeed Kim Jong Un? The mystery of North Korea's succession has finally been solved; The name of the new boss is in the air! | किम जोंग उन यांच्यानंतर कोण? अखेर उत्तर कोरियाच्या वारसाचे गूढ उकलले; नव्या बॉसच्या नावाची हवा!

किम जोंग उन यांच्यानंतर कोण? अखेर उत्तर कोरियाच्या वारसाचे गूढ उकलले; नव्या बॉसच्या नावाची हवा!

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन आपल्या क्रूर वर्तवणुकीमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, आता चर्चा त्यांच्या क्रूरतेची नाही, तर त्यांच्या वारसाची रंगली आहे. ४२ वर्षांच्या किम जोंग उन यांनी आपल्या सत्तेचा वारसदार म्हणून आपली लाडकी मुलगी किम जू ए हिची निवड केल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दक्षिण कोरियाची गुप्तचर संस्था 'नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिस'ने दिलेल्या माहितीनुसार, किम जू ए आता उत्तराधिकारी नियुक्तीच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

कोण आहे ही किम जू ए? 

किम जू ए बद्दल जगाला फारशी माहिती नाही. ती साधारण १३ वर्षांची असून तिचा जन्म २०१३ मध्ये झाल्याचे मानले जाते. नोव्हेंबर २०२२ मध्ये एका क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान ती पहिल्यांदा जगासमोर आली होती. तेव्हापासून ती सातत्याने आपल्या वडिलांसोबत लष्करी परेड, शस्त्रास्त्र चाचण्या आणि मोठ्या सरकारी कार्यक्रमांमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच तिने आपल्या वडिलांसोबत बीजिंगचा दौरा करून चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतली होती.

लहान वयात मोठी जबाबदारी! 

एनआयएसच्या दाव्यानुसार, किम जू ए केवळ वडिलांसोबत फिरत नाहीये, तर ती आता धोरणात्मक निर्णयांमध्येही आपली मते मांडू लागली आहे. तिला उत्तर कोरियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली पद मिळाले असल्याचे बोलले जात आहे. जानेवारी २०२६ मध्ये तिने 'कुमसुसन सन पॅलेस'ला दिलेली भेट हे ती भविष्यातील हुकूमशहा असण्याचे सर्वात मोठे लक्षण मानले जात आहे.

किम घराण्याची चौथी पिढी! 

उत्तर कोरियाची सत्ता नेहमीच किम घराण्याकडे राहिली आहे. किम इल सुंग, त्यानंतर किम जोंग इल आणि आता किम जोंग उन. आता किम जू ए च्या रूपाने या देशात सत्तेची चौथी पिढी सज्ज होत आहे. किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत वारंवार अफवा येत असतात, अशा परिस्थितीत आपल्या हयातीतच वारसदार घोषित करून किम यांना आपली सत्ता अधिक सुरक्षित आणि स्थिर करायची आहे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

९ व्या पार्टी काँग्रेसकडे जगाचे लक्ष 

या महिन्याच्या अखेरीस उत्तर कोरियात '९ वी पार्टी काँग्रेस' आयोजित केली जाणार आहे. हा देशातील सर्वात मोठा राजकीय कार्यक्रम असतो. या अधिवेशनात किम जू ए हिला एखादे अधिकृत पद मिळते का? याकडे संपूर्ण जगाचे डोळे लागले आहेत. जर तिला अधिकृत जबाबदारी मिळाली, तर तिच्या उत्तराधिकारी असण्यावर शिक्कामोर्तब होईल.

सध्यातरी प्योंगयांगकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, पण किम जू एची वाढती सक्रियता पाहता, उत्तर कोरियाचे भविष्य एका अल्पवयीन मुलीच्या हातात जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

Web Title : किम जोंग उन का उत्तराधिकारी: क्या बेटी किम जू ए सत्ता संभालने को तैयार?

Web Summary : खबरों के अनुसार, किम जोंग उन की बेटी, किम जू ए, उत्तर कोरिया में संभावित उत्तराधिकारी हैं। यह युवती राजकीय मामलों में तेज़ी से दिख रही है, जिससे नेता के रूप में उसकी भावी भूमिका के बारे में अटकलें तेज़ हो गई हैं, जो संभावित रूप से किम राजवंश के शासन की चौथी पीढ़ी को चिह्नित कर सकती है।

Web Title : Kim Jong Un's Successor: Daughter Kim Ju Ae Poised to Take Over?

Web Summary : Kim Jong Un's daughter, Kim Ju Ae, is reportedly the likely successor in North Korea. The young girl has been increasingly visible in state affairs, fueling speculation about her future role as leader, potentially marking the fourth generation of the Kim dynasty's rule.