कोण आहेत श्रीराम कृष्णन? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी AI पॉलिसी अ‍ॅडव्हायझर बनवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 21:32 IST2024-12-24T21:24:14+5:302024-12-24T21:32:50+5:30

Sriram Krishnan : सध्या श्रीराम कृष्णन एका स्टार्टअपचे मालक आहेत. ते आता व्हाईट हाऊस ऑफिसच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसीवर काम करतील.

Who is Sriram Krishnan, Chennai-born techie named by Trump as AI advisor? | कोण आहेत श्रीराम कृष्णन? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी AI पॉलिसी अ‍ॅडव्हायझर बनवलं!

कोण आहेत श्रीराम कृष्णन? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी AI पॉलिसी अ‍ॅडव्हायझर बनवलं!

Sriram Krishnan : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चेन्नईत जन्मलेल्या भारतीय वंशाच्या श्रीराम कृष्णन यांची आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे (एआय) वरिष्ठ धोरण सल्लागार (सिनिअर पॉलिसी अ‍ॅडव्हायझर) म्हणून नियुक्ती केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत श्रीराम कृष्णन हे डोनाल्ड ट्रम्प यांना सर्व प्रकारचे सल्ले देतील. तसेच, श्रीराम कृष्णन यांना इलॉन मस्क यांचे निकटवर्तीय मानले जाते. याशिवाय, त्यांनी मायक्रोसॉफ्टचे काम केले आहे. सध्या श्रीराम कृष्णन एका स्टार्टअपचे मालक आहेत. ते आता व्हाईट हाऊस ऑफिसच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसीवर काम करतील.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. श्रीराम कृष्णन अमेरिकन नेतृत्वाला आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचेशी संबंधित निर्णय घेण्यास आणि सरकारच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स पॉलिसीला आकार देण्यास मदत करतील. ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अ‍ॅडव्हायझरी कौन्सिलसोबतही काम करतील. तसेच, डेव्हिड सॅकसोबत ते टेक्नॉलॉजी आणि पॉलिसीवर काम करतील. दरम्यान, आपल्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करत श्रीराम कृष्णन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले आहेत.

श्रीराम कृष्णन कोण आहेत?
श्रीराम कृष्णन यांचा जन्म चेन्नई येथे झाला. त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांना टेक्नॉलॉजीची प्रचंड आवड होती. श्रीराम कृष्णन यांनी कोडिंगचे ज्ञान अशा वेळी संपादन केले, जेव्हा त्यांच्याकडे इंटरनेट नव्हते, असे सांगितले जाते. तर 2005 मध्ये त्यांनी अन्ना विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. येथे त्यांनी इन्फॉर्मेंशन टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतले.

श्रीराम कृष्णन यांची कारकीर्द 
श्रीराम कृष्णन यांना मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, ट्विटर आणि स्नॅपसह अनेक आघाडीच्या कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. फेसबुकमध्ये  श्रीराम कृष्णन यांनी फेसबुक ऑडियंस नेटवर्क तयार केले, जे गुगलच्या अ‍ॅड टेक्नॉलॉजीला टक्कर देत होते. ट्विटरवर युजरबेस मिळवण्यातही मदत केली. 2021 मध्ये त्यांनी Web3 आणि एआय सारख्या इनोव्हेटिव टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित केले. 2022 मध्ये इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर ते वाढण्यात आणि बदलण्यात श्रीराम कृष्णन यांचा हात होता. एआय आणि सोशल मीडिया ट्रेंडमुळे ते एआय लीडर म्हणून प्रसिद्ध झाले.

Web Title: Who is Sriram Krishnan, Chennai-born techie named by Trump as AI advisor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.