सौंदर्य आणि शौर्याचा संगम! कोण आहे पाकिस्तानी महिला मेजर आयशा खान? सध्या जगभरात का होतेय चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 14:21 IST2026-04-02T14:20:46+5:302026-04-02T14:21:03+5:30
सोशल मीडिया असो किंवा आंतरराष्ट्रीय संरक्षण वर्तुळ, सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा आहे, ते नाव म्हणजे मेजर आयशा खान.

सौंदर्य आणि शौर्याचा संगम! कोण आहे पाकिस्तानी महिला मेजर आयशा खान? सध्या जगभरात का होतेय चर्चा?
सोशल मीडिया असो किंवा आंतरराष्ट्रीय संरक्षण वर्तुळ, सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा आहे, ते नाव म्हणजे मेजर आयशा खान. पाकिस्तान लष्करातील ही महिला अधिकारी आपल्या कर्तृत्वाने आणि विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाच्या शांती सेनेतील आपल्या कार्यकाळामुळे प्रकाशझोतात आली आहे. नुकताच त्यांनी सायप्रसमधील आपला सेवाकाळ पूर्ण केला असून, त्यांच्या निरोप समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
संयुक्त राष्ट्र संघाने मानले आभार
मेजर आयशा खान या सायप्रसमधील संयुक्त राष्ट्र शांती सेनेत 'मिलिट्री पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर' म्हणून तैनात होत्या. त्यांच्या निरोपाच्या दिवशी UNFICYPने अधिकृत एक्स हँडलवरून त्यांचे कौतुक केले. "आज आम्ही मेजर आयशा खान यांना निरोप देत आहोत. त्यांनी एक वर्षापेक्षा जास्त काळ लष्करी जनसंपर्क अधिकारी आणि महिला शांती सैनिकांसाठी एक फोकल पॉईंट म्हणून मोलाची भूमिका बजावली," असे पोस्टमध्ये म्हटले आहे.
कोण आहेत मेजर आयशा खान?
मेजर आयशा शौकत खान या पाकिस्तान लष्करातील एक अत्यंत कार्यक्षम अधिकारी आहेत. त्यांचे लष्करी पार्श्वभूमी मजबूत असून स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन आणि जनसंपर्क विषयात त्यांचे विशेष कौशल्य आहे. केवळ सीमेवर बंदूक धरून रक्षण करणेच नव्हे, तर जागतिक स्तरावर देशाची आणि लष्कराची प्रतिमा सुधारण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे काम केले आहे. त्यांच्या कामासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणि सौंदर्याचीही सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगते.
Today #UNFICYP bids farewell to Major Ayesha Khan from #Pakistan 🇵🇰. Major Khan served for over a year in #Cyprus as a Military Public Information Officer and a focal point for uniformed women peacekeepers.
— UN Cyprus (@UN_CYPRUS) April 1, 2026
She made significant contributions to the Mission in her role of media… pic.twitter.com/0GDn4Dw7zx
सायप्रसमध्ये बजावली मोठी कामगिरी
१९६४ पासून कार्यरत असलेल्या UNFICYP मिशनमध्ये आयशा यांनी अशा वेळी काम केले, जेव्हा सायप्रसमध्ये तणाव कमी करण्यासाठी आणि दोन्ही बाजूंमधील विश्वास वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू होते. त्यांनी केवळ मीडिया आणि मिशनमध्ये दुवा म्हणून काम केले नाही, तर शांती सेनेत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि लैंगिक समानता जपण्यासाठी विशेष पुढाकार घेतला.
२०२६ च्या सुरुवातीला मायदेशी परतल्या
आपला यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर २०२६ च्या सुरुवातीला त्यांनी हे मिशन सोडले. त्यांच्या कार्याची दखल घेत संयुक्त राष्ट्र संघाने त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. शांती सेनेतील महिला नेतृत्वाचे एक उत्तम उदाहरण म्हणून आज मेजर आयशा खान यांच्याकडे पाहिले जात आहे.