कोण आहे कॅथरीन बर्गम? डोनाल्ड ट्रम्प यांनी पतीसमोरच केलं फ्लर्ट! बघा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 20:36 IST2026-01-31T20:36:24+5:302026-01-31T20:36:58+5:30
माथ्यमांसोबत बोलताना ट्रम्प आपल्याच सरकारमधील गृह सचिवांच्या पत्नीशीच फ्लर्ट करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, तिच्या पतीसमोरच.

कोण आहे कॅथरीन बर्गम? डोनाल्ड ट्रम्प यांनी पतीसमोरच केलं फ्लर्ट! बघा VIDEO
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहतात. मात्र, यावेळी त्यांच्या एका कृतीने संपूर्ण अमेरिकेत गदारोळ उडाला आहे. ट्रम्प यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात, माथ्यमांसोबत बोलताना ते आपल्याच सरकारमधील गृह सचिवांच्या पत्नीशीच फ्लर्ट करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, तिच्या पतीसमोरच.
नेमकं काय घडलं? -
हा संपूर्ण प्रकार घडला, व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये. तेथे ट्रम्प पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी अमेरिकेचे गृह सचिव डग बर्गम यांची पत्नी कैथरीन बर्गम यांच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले. या वेळी ते म्हणाले, "आपण जेव्हा कॅथरीन यांना पहिल्यांदा बघितले, तेव्हाच त्यांच्या सौंदर्यावर फिदा झालो होतो आणि केवळ याच कारणास्तव आपण त्यांचे पती डग बर्गम यांची गृह सचिवपदी नियुक्ती केली."
कॅथरीन यांच्यासंदर्भात नेमकं काय म्हणाले ट्रम्प -
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ट्रम्प म्हणत आहेत, "मी एका व्हिडिओमध्ये त्यांना (कॅथरीन) घोडेस्वारी करताना बघितले होते. मी विचारले ही कोण? मला कॅथरीनबद्दल जाणून घ्यायचे होते, त्यांच्या पतीबद्दल नाही. जेव्हा मला त्यांची माहिती मिळाली, तेव्हाच मी ठरवले की, मी त्यांच्या पतीला नोकरीवर ठेवणार." यानंतर ते कैथरीन यांच्याकडे बघत म्हटले, "तुमच्यासारख्या व्यक्तीसोबत काम करणे एक चांगला अनुभव आहे." यानंतर, लगेचच सारवासारव करत दोघेही एक उत्तम कपल असल्याचेही ते म्हणाले. मात्र, या घटनेमुळे ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
BREAKING: Trump just claimed that he hired Doug Burgum because he was attracted to his wife. What an awkward moment.
— Brian Krassenstein (@krassenstein) January 29, 2026
"I saw them riding horses in a video. And I said, 'Who is that?' I was talking about her, not him. I said, 'I'm gonna hire her,' because anybody that has… pic.twitter.com/BE7BqEql0T
कोण आहेत डग बर्गम?
डग बर्गम हे ट्रम्प प्रशासनात गृह सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावर अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे. ५७ वर्षीय कॅथरीन या डग यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. डग बर्गम यांनी यापूर्वी मायक्रोसॉफ्टमध्ये काम केले असून ते नॉर्थ डकोटाचे ३३ वे गव्हर्नरही राहिले आहेत. २००३ मध्ये पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी कैथरीन यांच्याशी लग्न केले.