जगभरात किती टक्के लोकांमध्ये विकसित झाली कोरोना अँटीबॉडी?; WHO ने दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 03:12 PM2021-03-01T15:12:59+5:302021-03-01T15:31:29+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना अँटीबॉडी संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने त्याबाबत माहिती दिली आहे. 

who estimates coronavirus antibodies present in only 10 percent of people worldwide | जगभरात किती टक्के लोकांमध्ये विकसित झाली कोरोना अँटीबॉडी?; WHO ने दिली महत्त्वाची माहिती

जगभरात किती टक्के लोकांमध्ये विकसित झाली कोरोना अँटीबॉडी?; WHO ने दिली महत्त्वाची माहिती

Next

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल दहा कोटींवर पोहोचली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्य़ासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी चाचण्यांना देखील यश आलं आहे. याच दरम्यान कोरोना अँटीबॉडी संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने त्याबाबत माहिती दिली आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगातील एकूण लोकसंख्येच्या 10 टक्क्यांपेक्षाही कमी लोकसंख्येत कोरोना अँटीबॉडी विकसित झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली. सौम्या स्वामीनाथन यांनी अत्यंत उच्च घनता असलेल्या शहरी वस्तींमध्येही लोकसंख्येच्या 50 ते 60 टक्के लोकांना व्हायरसची लागण झाली आणि त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज विकसित झाली आहे असं म्हटलं आहे. तसेच हर्ड इम्युनिटी मिळवण्यासाठी लसीकरण हा एकमेव मार्ग असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.  

"सध्या मंजूर झालेल्या लसी या गंभीर आजार, रुग्णालयात दाखल होणे आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूपासून संरक्षण देतात. सौम्य आजार आणि करोना विषाणूच्या संसर्गाशी संबंधित लसांच्या परिणामकारकतेचा अद्याप अभ्यास केला जात आहे" अशी माहिती सौम्या स्वामीनाथन यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,10,96,731 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 15,510 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 106 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

बापरे! '...तर यंदाची होळी ठरू शकते 'सुपर स्प्रेडर ऑफ कोरोना"; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

देशात सातत्याने कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. लोकांनी योग्य ती काळजी न घेतल्यास यंदाची होळी ही "सुपर स्प्रेडर ऑफ कोरोना' ठरू शकेल असा इशारा आरोग्य तज्ञांनी दिला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ शकते. महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगण आणि जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. याच दरम्यान तज्ज्ञांनी हा इशारा दिला आहे. कोरोनाच्या बाबतीत आता जर निष्काळजीपणा दाखवला तर येत्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत खूप मोठी वाढ होऊ शकते. यामुळे अशा परिस्थितीत आपण सार्वजनिक कार्यांपासून दूर राहिलं पाहिजे. विशेषत: होळीच्या वेळी. कारण या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही. 

होळीच्या काळात सध्याच्या तुलनेत अनेक पटीने रुग्णसंख्या वाढू शकतात. यामुळे प्रशासनाने दिलेले सूचनांचं पालन नागरिकांनी करणं गरजेचं आहे. तसेच कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नसल्याने काळजी घेणं गरजेचं आहे. खुल्या मनाने नागरिकांचं स्वागत करा, पण हात मिळवणं आणि मिठी मारण्यापासून टाळा. मास्क घालून कोरोनाशी संबंधित सोशल डिस्टंसिंगसारख्या इतर नियमांचं पालन करा अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दिल्लीत जवळपास 35 दिवसांनंतर एका दिवसात सर्वाधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. सध्याच्या स्थितीत देशात सामाजिक मेळावे किंवा जाहीर सभा आयोजित करणं योग्य नाही. कारण कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. यासह देशात कोरोनाचा नवा स्ट्रेनही समोर आला असल्याची माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे.

Web Title: who estimates coronavirus antibodies present in only 10 percent of people worldwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.