शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

स्टिफन हॉकिंग यांच्या 50 वर्षींनी आलेल्या पीएचडी प्रबंधामुळे क्रॅश झाली होती केंब्रिजची वेबसाइट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 10:01 AM

विश्वाची उत्पत्ती आणि कृष्णविवरांसंदर्भात त्यांनी मांडलेल्या सिद्धांतांना वैज्ञानिक जगतात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. कृष्णविवराबद्दल सखोल मांडणी करणारे स्टीफन हॉकिंग ऑक्टोबर 2017 मध्ये  नव्याने चर्चेमध्ये आले होते.

लंडन - ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी (14 मार्च) सकाळी निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. केंब्रिज येथील राहत्या घरी हॉकिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. हॉकिंग यांच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विश्वाची उत्पत्ती आणि कृष्णविवरांसंदर्भात त्यांनी मांडलेल्या सिद्धांतांना वैज्ञानिक जगतात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. कृष्णविवराबद्दल सखोल मांडणी करणारे स्टीफन हॉकिंग ऑक्टोबर 2017 मध्ये  नव्याने चर्चेमध्ये आले होते. स्टीफन यांच्या पीएचडीचा प्रबंध केंब्रिज विद्यापीठाने संकेतस्थळावर टाकताच जगभरातील विद्यार्थी, संशोधक आणि विचारवंत त्यावर अक्षरशः तुटून पडले. प्रबंध वाचण्यासाठी लाखो लोकांनी संकेतस्थळ उघडल्याने केंब्रिज विद्यापिठाचे संकेतस्थळच क्रॅश झालं होतं.

1966 साली स्टीफन यांनी "प्रॉपर्टीज ऑफ एक्स्पांडिग युनिवर्सेस" हा प्रबंध लिहिला होता. त्या प्रबंधास लिहून 50 वर्षे उलटून गेल्यानंतर तो संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचा निर्णय केंब्रिजने घेतला. त्यानंतर मिळालेल्या प्रतिसादाबद्दल बोलताना विद्यापीठाचे प्रवक्ते स्टुअर्ट रॉबर्ट म्हणाले होते की, "हा प्रबंध संकेतस्थळावर टाकण्याच्या निर्णयाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. 24 तासांच्या अवधीमध्ये हा प्रबंध 60 हजार लोकांनी डाऊनलोड केला, त्यामुळे संकेतस्थळाची गती कमी झाली. काही वेळेस वाचकांना वेबपेज तात्पुरतं उपलब्ध नाही' असा संदेश मिळत होता."

 

 

कोण होते स्टीफन हॉकिंग ?हॉकिंग यांचा जन्म 8 जानेवारी 1942 साली इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड येथे झाला होता. हॉकिंग्ज एनर्जी, हॉकिंग्ज रेडिएशन यांसह अनेक शोधांसाठी ते प्रसिद्ध आहेत. हॉकिंग्ज यांची ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम, ब्लॅक होल अॅन्ड बेबी युनिवर्सेस अन्ड इदर एसेज, द युनिवर्स इन नटशेल, ऑन द शोल्डर्स ऑफ जायंटस यांसारखी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. भौतिकशास्त्रातले जगातील अत्यंत मानाचे व मोठे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

2001 साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या मुंबईतील विज्ञानक्षेत्रातील संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या 'स्ट्रींग' या परिषदेसाठी त्यांना आमंत्रित केलं होतं. त्या परिषदेत हॉकिंग यांनी दिलेलं व्याख्यान प्रसिद्ध आहे. टीआयएफआरने त्यांना सरोजिनी दामोदरन फेलोशिपही दिली होती. 

टॅग्स :Stephen Hawkingस्टीफन हॉकिंगscienceविज्ञान