शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पाकिस्तानची तीन देश कोंडी करतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 09:10 IST

दहशतवादी अड्डयांना पोसायचे आणि नंतर आम्हीच कसे दहशतवादाचे बळी आहोत याची टिमकी वाजवायची ही पाकिस्ताची नेहमीची नीती. मात्र भारतीय उपखंडातील तीन महत्त्वाच्या देशांनी म्हणजे भारत, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांनी यूएनच्या आमसभेत पाकिस्तानची यावरुन चांगलीच कोंडी केली.

संयुक्त राष्ट्रे, दि.23- दहशतवादी अड्डयांना पोसायचे आणि नंतर आम्हीच कसे दहशतवादाचे बळी आहोत याची टिमकी वाजवायची ही पाकिस्ताची नेहमीची नीती. मात्र भारतीय उपखंडातील तीन महत्त्वाच्या देशांनी म्हणजे भारत, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांनी यूएनच्या आमसभेत पाकिस्तानची यावरुन चांगलीच कोंडी केली. पाकिस्तानात सुरू असलेल्या दहशतवादाच्या केंद्रांवरुन जगाचे लक्ष हटवण्यासाठी पाकिस्तान रडगाणी गात असल्याचा आरोप करुन या तिन्ही देशांनी पाकिस्तानच्या दुतोंडी भूमिकेवर बोट ठेवले.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांनी अफगाणिस्तानमधील दहशतवादी कृत्ये, यादवी तसेच परकीय शक्तींचा हस्तक्षेप याचा पाकिस्तानलाही त्रास होतो, आमचेही नागरिक अमेरिकेने २००१ पासून सैन्य पाठवल्यानंतर मेले असा सूर लावला. आपल्या देशातील दहशतवादावर बोलण्याएेवजी अफगाणिस्तानकडे लक्ष वळवणा-या अब्बासी यांचा अफगाणिस्तानने विनाविलंब खरपूस समाचार घेतला. अफगाणिस्तानने राईट टू रिप्लायचा वापर करताना अफगाणिस्तानच्या यूएनमधील प्रतिनिधीने पाकिस्तानचा खरा चेहरा काही क्षणांमध्ये सर्वांच्या समोर आणला. "स्वतःच्या देशातील दहशतवादाच्या पोषणकेंद्रांवरुन लक्ष हटवण्यासाठी पाकिस्तान आमचा उल्लेख करत आहे. पाकिस्तानातील दहशतवादाला मिळणा-या सरकारी व बिनसरकारी पाठिंब्यामुळेच अफगाणिस्तानातील दहशतवादाला खतपाणी मिळते हो सगळ्या जगाला माहिती आहे." असे सांगत या प्रतिनिधीने म्हटले चला दहशतवादाचे खरे चित्र स्पष्ट होण्यासाठी चला काही प्रश्न विचारू -

अल कायदाचा मास्टरमाइंड ओसामा बिन लादेन कोठे मारला गेला?उत्तर आहे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद

तालिबानचा नेता मुल्ला ओमर कोठे मेला? कराचीतील रुग्णालयात 

मुल्ला अख्तर मन्सूर कोठे सापडला आणि मारला गेला ?

उत्तर आहे पाकिस्तानातील बलुचिस्तानात

आणि त्याच्याकडे कोणत्या देशाचा पासपोर्ट होता सांगा पाहू ? पाकिस्तान 

अफगाणिस्तानात येणारा प्रत्येक दहशतवादी घटक आणि जगाने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या २० संघटनांचे दहशतवादी अफगाणिस्तानात कोणत्या देशातून येतात? उत्तर आहे पाकिस्तान

अशा प्रकारे अत्यंत नाट्यमयरित्या पाकिस्तानचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आणत अफगाणिस्तानचा प्रतिनिधी पुढे म्हणाला, "अफगाणिस्तानातील कथित यादवी आणि परकीय हस्तक्षेपाच्या कितीतरी आधी पाकिस्तानात राजकीय ध्येय साध्य करण्यासाठी हिंसक संघटनांचा वापर केला जातो. इतकेच नव्हे तर ३१ मे रोजी काबूलमध्ये स्फोट घडवणारे पाकिस्तानात आले असल्याची शक्यता पाकिस्तानचे आदरणीय पंतप्रधान अब्बासी यांनी नुकतीच वर्तवली आहे. त्यामुळे दहशतवादी संघटनांना आमचा पाठिंबा असल्याचा आरोप आम्ही फेटाळून लावतो, ही समोर ठेवलेली तथ्यंच सर्व काही सांगतात". अशा शब्दांमध्ये अफगाणिस्तानने यूएनमध्ये पाकिस्तानवर 'हल्ला' चढवला.

अफगाणिस्तानप्रमाणे भारतानेही राईट टू रिप्लायचा वापर करत अब्बासी यांना चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान हे टेररिस्तान बनले आहे असा थेट उल्लेख करत भारतीय प्रतिनिधीने अत्यंत शांतपणे पाकिस्तानचे ढोंग उघड केले. पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्रांचा उल्लेख करत काश्मीर भारताचा अविभाज्य अंग असून भविष्यातही ते आमचेच राहिल असा स्पष्ट संदेश दिला. इतकेच नव्हे तर पाकिस्तान हे एक अपयशी राष्ट्र असून भारताला लोकशाही मूल्ये मानवाधिकार याबाबत पाकिस्तानने शिकवण्याची गरज नाही असा सल्लाही भारताने दिला. इकडे रोहिंग्यांचा प्रश्न आणि दहशतवादावर बोलण्यासाठी उभ्या राहिलेल्या बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांनी १९७१ साली पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानात केलेल्या हिंसाचाराचा उल्लेख करुन पाक लष्कराचा क्रूर चेहरा सर्वांच्या समोर आणला.  १९७१ साली मार्च महिन्यात पाकिस्तानच्या लष्कराने तत्कालिन पूर्व पाकिस्तानात अत्यंत घृणास्पद असे आँपरेशन सर्च लाईटद्वारे ३० लाख लोकांची कत्तल करुन वंशच्छेदास सुरुवात केली अशा स्पष्ट शब्दांमध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांनी पाकिस्तानवर शाब्दिक तोफ डागली. पाकिस्तान लष्कराने केलेल्या या हिंसक वंशच्छेदात २ लाख महिलांवर अत्याचार व बुद्धिजिवींची हत्या केल्याचेही वाजेद यांनी स्पष्ट सांगितले २५ मार्च १९७१ पासून सुरु झालेला लढा नऊ महिने चालला होता. २५ मार्चला 'जेनोसाइड डे '  जाहीर करण्याचा निर्णय नुकताच बांगलादेशच्या संसदेने घेतल्याचे वाजेद म्हणाल्या.पाकिस्तानतर्फे करण्यात येणार्या विविध विधानांचा  कडाडून विरोध करुन पाकिस्तानचे दावे वाजेद यांनी खोडून काढले.