जे वर्तवलं, ते खरं ठरलं...! 2025 साठीही केलीय धडकी भरवणारी भविष्यवाणी! कोण आहेत निकोलस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 14:53 IST2025-01-23T14:52:43+5:302025-01-23T14:53:48+5:30
औजुला यांच्या मते, २०२५ मध्ये तिसरे महायुद्ध होणार हे निश्चित आहे. या वर्षी धर्म आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली मोठ्या संख्येने लोक एकमेकांना मारतील अन्......

जे वर्तवलं, ते खरं ठरलं...! 2025 साठीही केलीय धडकी भरवणारी भविष्यवाणी! कोण आहेत निकोलस
निकोलस औजुला ही एक अशी व्यक्ती आहे जिने गेल्या दशकात केलेली अनेक भाकिते खरी ठरली आहेत. कोरोनापासून ते ट्रम्प पुन्हा एकदा निवडून येण्यापर्यंत, त्यांची भाकितं खरी ठरली आहेत. त्यांनी या वर्षासाठीही भविष्यवाणी केली आहे. त्यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच या वर्षात काय होणार हे सांगितले आहे. त्यानी धडकी भरवणारे भाष्य केले आहे. आता त्यांच्या विधानांची तुलना 'भविष्य मालिका' या प्राचीन उडिया पुस्तकातील भाकितांशी केली असता, दोघांचीही भाकितं सारखीच आढळून आली आहेत.
खरे तर, 'भविष्य मालिका' या पुस्तकातही 2025 हे वर्ष वाईट असल्याचे म्हणण्यात आले आहे. १६ व्या शतकातील या पुस्तकात यावर्षी युद्ध आणि दुष्काळाची भविष्यवाणी करण्यात आली आहे. मात्र, निकोलस औजुलाच्या जुन्या अचूक भाकित्यांचा आधार कोणत्याही पुस्तकात आढळत नाही. अशा परिस्थितीत, असे म्हणता येईल की, भविष्य मलिका आणि निकोलस यांचे भाकित वेगवेगळ्या आधारांवर आधारित असू शकतात. मात्र या दोन्ही भाकितांमध्ये २०२५ हे वर्ष विनाशाचे वर्ष असल्याचे म्हटले जात आहे.
औजुला यांची भविष्यवाणी? -
औजुला यांच्या मते, २०२५ मध्ये तिसरे महायुद्ध होणार हे निश्चित आहे. या वर्षी धर्म आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली मोठ्या संख्येने लोक एकमेकांना मारतील. राजकीय हत्या होतील. मुसळधार पाऊस पडेल आणि विनाशकारी पूर येईल. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे अनेक शहरे बुडण्याचा धोका निर्माण होईल. महागाई शिगेला पोहोचेल.
औजुला यांनी आपला देश ब्रिटनबसंदर्भातही काही गोष्टी सांगितल्या आहेत. यात, ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांचे राजकीय पतन आणि ब्रिटनचे प्रिन्स विल्यम आणि हॅरी यांच्यातील समेट यांचा समावेश आहे.
कोण आहेत निकोलस औजुला? -
३८ वर्षीय निकोलस औजुला लंडनमधील हिप्नोथेरपिस्ट आहेत. ते १७ वर्षांचे असल्यापासून त्यांना काही स्वप्न पडत होती आणि त्या आधारे ते भविष्यवाणी करत होते. औजुला यांनी स्वतः कोरोना महामारी, अमेरिकेतील ब्लॅक लाईव्हज मॅटर चळवळ, आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये वाढ, फ्रान्समधील नोट्रे डेम आग आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय यासारखी भाकितं केली होती, जी खरी ठरली आहेत.