हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 13:15 IST2025-10-30T13:13:19+5:302025-10-30T13:15:07+5:30
What Is Poseidon: रशियाने अणुऊर्जेवर चालणाऱ्या 'पोसायडॉन' नावाच्या महाकाय टॉर्पेडोची यशस्वी चाचणी केली.

हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी २९ ऑक्टोबर रोजी जगाला हादरवणारी एक मोठी घोषणा केली. रशियाने अणुऊर्जेवर चालणाऱ्या 'पोसायडॉन' नावाच्या महाकाय टॉर्पेडोची यशस्वी चाचणी केली. हे पाण्याखालील अणुशस्त्र आहे. पुतिन यांनी त्याचे वर्णन 'जगात अतुलनीय' असे केले असून, ते रशियाच्या आयसीबीएम क्षेपणास्त्रापेक्षाही अधिक शक्तिशाली आहे.
BREAKING:
— Current Report (@Currentreport1) October 29, 2025
Putin said Russia has tested the Poseidon, a nuclear-powered underwater vehicle said to be more powerful than the Sarmat ICBM, with nothing else like it in the world.
The weapon can carry a nuclear warhead and is often called a 'doomsday torpedo' pic.twitter.com/EFrbZLC4E3
या अणुशस्त्राला 'विनाशाचा टॉर्पेडो' म्हटले जाते. पोसायडॉन हे रशियाच्या अणुशक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी डिझाइन केलेले आणि अमेरिकेसारख्या देशांच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींना भेदण्यासाठी त्याची रचना करण्यात आली. पोसायडॉन हे एक प्रकारचे ड्रोन आहे, जे समुद्रात लांब अंतर प्रवास करू शकते. हे अणुशस्त्र पाणबुडीतून सोडले जाते आणि अणु इंजिनद्वारे चालवले जाते. हे अणुशस्त्र हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट शक्तिशाली आहे, असा दावा केला जात आहे.
पोसायडॉनची खासियत
लांबी: अंदाजे २४ मीटर (मोठ्या बस इतकी लांब).
रुंदी: २ मीटर.
वजन: अंदाजे १०० टन.
वेग: ताशी १८५ किलोमीटर पाण्याखाली. हे इतके वेगवान आहे की सामान्य नौदल ते पकडू शकणार नाही.
खोली: १,००० मीटरपर्यंत डुबकी मारू शकते.
रेंज: अणुऊर्जेद्वारे चालवले जाणारे, ते महिनोनमहिने समुद्रात फिरू शकते. १४,००० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करू शकते.
वॉरहेड: २ मेगाटन अणुबॉम्ब (हिरोशिमा बॉम्बपेक्षा १०० पट जास्त शक्तिशाली)
नेव्हिगेशन: जीपीएस आणि स्वायत्त प्रणाली वापरून स्वतःचा मार्ग शोधते.
रशियाने अमेरिकेसारख्या देशांच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींना रोखण्यासाठी त्याची रचना केली. हे शस्त्र २०१५ पासून विकसित केले जात आहे. पुतिन यांनी पोसायडॉनच्या यशस्वी चाचणीला मोठी उपलब्धी म्हटले आहे. याआधी रशियाने'बुरेव्हेस्टनिक' क्षेपणास्त्राची चाचणी देखील केली होती.