इराण-अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धाला २८ दिवस पूर्ण झाले असून, आता या संघर्षाने रौद्र रूप धारण केले आहे. इराणने 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस-४' अंतर्गत इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर ४०० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला आहे. यामध्ये इराणचे सर्वात घातक अस्त्र मानले जाणारे 'जुल्फिकार' क्षेपणास्त्र गेम चेंजर ठरत असून, याला रोखणे इस्रायल आणि अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणांना कठीण जात असल्याचे चित्र आहे.
इस्रायलच्या मुख्य शहरांना लक्ष्य
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने तेल अवीव, हायफा आणि दिमोनासारख्या महत्त्वाच्या शहरांवर जुल्फिकार क्षेपणास्त्रांनी हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे इस्रायलमध्ये मोठे नुकसान झाले असून अमेरिकेचे अल धफरा आणि व्हिक्टोरिया सारखे लष्करी तळही दहशतीखाली आहेत.
'जुल्फिकार'ची ताकद: रडारलाही चकवा!
हजरत अली यांच्या तलवारीचे नाव देण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये शत्रूच्या गोटात धडकी भरवणारी आहेत.
रेंज: ७०० ते १००० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता.
वेग: हे सॉलिड फ्यूलवर चालणारे क्षेपणास्त्र असल्याने अवघ्या काही मिनिटांत लॉन्च करता येते.
अचूकता: यात GPS आणि INS यंत्रणा असल्याने १० ते १०० मीटरच्या अंतरात हे अचूक मारा करते.
सर्वात मोठी भीती: प्रवासादरम्यान या क्षेपणास्त्राचे वारहेड वेगळे होते, ज्यामुळे रडारला ते ट्रॅक करणे किंवा 'पॅट्रियट' आणि 'थाड' सारख्या यंत्रणांना ते हवेतच नष्ट करणे अत्यंत अवघड जाते.
'देजफुल'ने वाढवली डोकेदुखी
जुल्फिकार सोबतच इराणने आपले अपग्रेडेड क्षेपणास्त्र 'देजफुल' देखील मैदानात उतरवले आहे. १ हजार किलोमीटरची रेंज आणि ६०० किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र अतिशय वेगवान आहे. मोबाइल लॉन्चर्सवर असल्याने इराण ही क्षेपणास्त्रे लपवून कोठूनही डागू शकतो, ज्यामुळे इस्रायलला प्रतिहल्ला करणे कठीण होत आहे.
दावे-प्रतिदावे आणि युद्धाचा पेच
इस्रायलने दावा केला आहे की, त्यांनी ९२ टक्के क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली आहेत. मात्र, इराणच्या सातत्यपूर्ण हल्ल्यांमुळे इस्रायलच्या 'एरो' आणि 'पॅट्रियट' डिफेन्स सिस्टमवर प्रचंड ताण आला आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ला १० दिवसांसाठी पुढे ढकलला असला, तरी इराणच्या या बॅलिस्टिक बॅटरीने युद्धाला अधिक प्रदीर्घ आणि विनाशकारी वळण दिले आहे.
Web Summary : Iran's 'Zulfiqar' missile, with a range of 1000km and GPS accuracy, is challenging Israel's defenses. Alongside the 'Dejful,' these mobile-launched missiles complicate Israeli retaliation, escalating the conflict despite claims of interceptions.
Web Summary : ईरान का 'जुल्फिकार' मिसाइल, 1000 किमी की रेंज और जीपीएस सटीकता के साथ, इजराइल की सुरक्षा को चुनौती दे रहा है। 'देजफुल' के साथ, ये मोबाइल-लॉन्च मिसाइलें इजरायली जवाबी कार्रवाई को जटिल बनाती हैं, जिससे टकराव बढ़ रहा है।