शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:50 IST

जेव्हा या अधिकाऱ्यांचा पासपोर्ट जारी केला तेव्हा या गंभीर गोष्टीचा खुलासा झाला. या दौऱ्यातील कागदपत्रानुसार अधिकाऱ्यांनी त्यांची ओळख मेडिकल कोअर सदस्य म्हणून केली होती.

पाकिस्तानी सैन्याचे ३ ब्रिगेडिअर जनरल्स नदीम अहमद, मोहम्मद नदीम तल्हा आणि सऊद अहमद राव २८ जून २०२५ रोजी बांगलादेशची राजधानी ढाका येथे पोहचले. हा दौरा अतिशय गुप्त ठेवला होता. या अधिकाऱ्यांची ओळख मेडिकल कोअर सदस्य म्हणून करण्यात आली. पाकिस्तानी सैन्याचे ३ बडे अधिकारी ओळख लपवून बांगलादेशात पोहचल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. या सर्वांचे आगमन एमीरेट्स एअरलाईन्सच्या फ्लाईटने झाले. त्यानंतर त्यांना ढाका येथील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबवण्यात आले होते. 

जेव्हा या अधिकाऱ्यांचा पासपोर्ट जारी केला तेव्हा या गंभीर गोष्टीचा खुलासा झाला. या दौऱ्यातील कागदपत्रानुसार अधिकाऱ्यांनी त्यांची ओळख मेडिकल कोअर सदस्य म्हणून केली होती. पत्रकार आणि गुप्तचर संस्थांनुसार ते तिघेही पाकिस्तानी ISI शी निगडीत अधिकारी होते. सर्वात आश्चर्यकारक म्हणजे बांगलादेश सरकारने या अधिकाऱ्यांचे रेड कार्पेट स्वागतच केले नाही तर त्यांच्यासाठी दक्षिण क्षेत्रातील कॉक्स बाजारात बांगलादेशी सैन्याची १० वी इन्फ्रंटी डिविजनचा दौरा आयोजित केला. हा दौरा महत्त्वाचा होता कारण कॉक्स बाजार म्यानमारच्या सीमेजवळील भाग आहे. 

तर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा बांगलादेशाच्या माध्यमातून अराकान लष्कराला सैन्य मदत पोहचवते. बांगलादेशात युनूस सरकार ISI अधिकाऱ्यांना मदत करत आहे. या हालचालींमुळे भारताच्या पूर्वेकडील राज्यात सुरक्षा धोरण, चीन-म्यानमार नीती, दक्षिण आशियातील राजकीय गणिते हे दिसून येतात असं ज्येष्ठ पत्रकार सलाह उद्दीन शोएब चौधरी यांनी म्हटलं. 

 दरम्यान, अलीकडेच  बांगलादेशात लेफ्टिनंट जनरल अबु तैयब मोहम्मद जहीरूल आलम यांची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती. जहीरूल आलमवर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI चा हस्तक आणि भारताविरोधी भावना भडकवण्याचा आरोप आहे. त्यांचे नाव बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या भावाशीही जोडले गेले आहे ज्याच्यावर भारताच्या पूर्वोत्तर राज्यात कट्टरपंथी विचारांना समर्थन देण्याचा आरोप आहे. जहीरूल आलम यांच्या नियुक्तीने बांग्लादेश आणि भारताचे संबंध आणखी बिघडण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतPakistanपाकिस्तान