'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 13:26 IST2025-09-16T13:24:59+5:302025-09-16T13:26:04+5:30
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये झालेल्या हल्ल्याबाबत आता नवीन माहिती समोर आली आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या कुटुंबाने याची माहिती दिली. जैशचा कमांडर मसूद इलियास काश्मिरी याने एका रॅलीत म्हटले आहे की, ७ मे रोजी भारताने बहावलपूरवर हल्ला केला तेव्हा मसूद अझहरचे कुटुंब तुकड्यांमध्ये विभागले गेले होते.

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'राबवूनपाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाला ठार केल्याची माहिती समोर आली होती. याबाबत आता जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर मसूद इलियास काश्मिरी याने माहिती दिली. त्याने मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्य ठार झाल्याचे कबुल केले आहे.
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
'७ मे रोजी भारताने बहावलपूरच्या दहशतवादी तळावर हल्ला केला तेव्हा दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाचे तुकडे तुकडे केल्याचे जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर मसूद इलियास काश्मिरी याने कबूल केले. तो म्हणाला की, या हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागला. कुटुंबातील अनेक सदस्य मारले गेले.
भारताने १०० किलोमीटर पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केला
बहावलपूर हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एक शहर आहे. येथे, जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय मरकझ सुभान अल्लाह नावाच्या ठिकाणी आहे. पाकिस्तानच्या आत १०० किलोमीटरवर असलेल्या ऑपरेशन सिंदूरचा हा सर्वात प्रमुख आणि प्राणघातक हल्ला होता. भारतीय सैन्याने ऑपरेशन अंतर्गत जैशच्या मुख्यालयाला लक्ष्य केले. या हल्ल्यात दहशतवाद्यांचा हा संपूर्ण तळ उद्ध्वस्त झाला. दहशतवादी मसूद अझहरचे कुटुंब या जैश तळात राहत होते. सॅटेलाईट फोटोमधून भारताच्या हल्ल्यात मरकझ सुभान अल्लाह उध्वस्त झाल्याचे दिसत आहे.
जैशच्या कार्यालयात भारतावर दहशतवादी हल्ल्याचा कट रचला
भारतीय लष्कराच्या प्रवक्त्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती दिली होती. यामध्ये त्यांनी जैशच्या तळावर हल्ला केल्याची माहिती दिली होती. भारताविरुद्ध अनेक हल्ले याच ठिकाणी रचल्याचे त्यांनी सांगितले.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या कारवाईअंतर्गत भारताने पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. ७ ते १० मे पर्यंत चाललेल्या या कारवाईदरम्यान, भारताने केवळ पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले नाहीत तर पाकिस्तानच्या नूर खान एअरबेस, रहीम खान एअरबेससह १०-१२ लष्करी तळही उद्ध्वस्त केले.