कसा दिसायचा खराखुरा सांताक्लॉज? जुन्या टेक्निकने १७०० वर्षांपूर्वीचा चेहरा बनवला, हुबेहूब...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 08:49 IST2024-12-06T08:49:07+5:302024-12-06T08:49:21+5:30
नाताळ जवळ आल्याने आता सर्वत्र लाल पोशाख दिसण्यास सुरुवात होणार आहे. हा सांताक्लॉज कोण होता, प्रत्यक्षात होता का की काल्पनिक होता. तो कसा दिसत होता याचा शोध संशोधकांनी घेतला आहे.

कसा दिसायचा खराखुरा सांताक्लॉज? जुन्या टेक्निकने १७०० वर्षांपूर्वीचा चेहरा बनवला, हुबेहूब...
नाताळ जवळ आल्याने आता सर्वत्र लाल पोशाख दिसण्यास सुरुवात होणार आहे. हा सांताक्लॉज असल्याचे मानले जाते. सांता येणार आणि गिफ्ट देणार असे म्हटले जाते. हा सांताक्लॉज कोण होता, प्रत्यक्षात होता का की काल्पनिक होता. तो कसा दिसत होता याचा शोध संशोधकांनी घेतला आहे. सुमारे १७०० वर्षांपूर्वीच्या सांताक्लॉजचा चेहरा एका जुन्या तंत्रज्ञानाद्वारे बनविण्यात आला आहे.
संशोधकांनी सेंट निकोलस यांचा चेहरा बनविला आहे. सेंट निकोलस हे चौथ्या शतकातील एक बिशप होते. त्यांनीच सांताच्या कहाणीला जन्म दिल्याचे सांगितले जाते. संशोधकांना निकोलस यांचे अवशेष सापडले होते. त्याच्या कवटीवरून निकोलस कसे दिसत होते याचा अभ्यास करण्यात आला आहे. यानंतर संगणकाच्या मदतीने त्यांच्या चेहऱ्याचा अंदाज लावण्यात आला. यानुसार सेंट निकोलस कसे दिसत असतील हे आता जगाला समजू शकले आहे.
सेंट निकोलस हे चांगल्या मुलांना गिफ्ट देण्यासाठी ओळखले जायचे. यामुळे त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांनी मूळत: डच आकृती सिंटरक्लासला प्रेरित केले. यानंतर हे मुलांसाठी खेळणी आणण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आनंदी, स्लीह-राइडिंग व्यक्तीमध्ये रुपांतरीत झाले.
तज्ञांनी तयार केलेला चेहरा 1823 च्या "ट्वास द नाईट बिफोर ख्रिसमस" या कवितेमध्ये वर्णन केलेल्या सांताक्लॉजच्या चेहऱ्याशी मिळताजुळता आहे. सेंट निकोलसच्या हाडांच्या तपासणीत असे दिसून आले की त्यांना सांधेदुखीचा त्रास होता आणि त्यांची कवटी खूप जाड होती. ते बहुतेक भाज्या आहारात खायचे असे शास्त्रज्ञांना वाटत आहे. निकोलस यांना तुर्कीमध्ये दफन करण्यात आले होते. नंतर त्यांच्या अस्थी इटलीला नेण्यात आल्या होत्या.