भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 11:58 IST2025-05-06T11:57:40+5:302025-05-06T11:58:03+5:30

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाची भीती सतत वाढत आहे. दरम्यान, आता बाबा वांगाच्या २०२५ सालाच्या भाकिताची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झाली आहे.

What does Baba Venga's prediction say about the India-Pakistan war? Read in detail | भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशातील लष्कर अलर्ट आहेत, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाची भीती सतत वाढत आहे. दरम्यान, आता बाबा वांगाच्या २०२५ सालाच्या भाकिताची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झाली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाबाबत बाबा वेंगा यांनी आधीच भविष्यवाणी केली होती. वेंगा यांनी २०२५ सालाबद्दलच्या भाकित्यांमध्ये, पृथ्वीवर एका मोठ्या युद्धाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. देशांचे नाव न घेता, त्यांनी त्यांच्या भाकित्यांद्वारे २०२५ मध्ये युद्धाची भीती व्यक्त केली आहे.

ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती

वेंगा यांनी युरोपचा पाया हादरवून टाकणाऱ्या संघर्षाचा इशारा दिला आहे. त्यांनी कोणत्याही देशाचे नाव घेतले नाही, पण आता भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत आहे. जगात अस्थिरता वाढत असताना, अनेक वर्षांपूर्वी केलेली त्यांची भविष्यवाणी आज पुन्हा एकदा चर्चेत आहे. वेंगा यांनी २०२५ मध्ये विनाशकारी भूकंपांचा अंदाजही वर्तवला होता. २८ मार्च रोजी म्यानमारमध्ये ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला आणि १,७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. या भूकंपाचा फटका थायलंडलाही बसला. या ठिकाणी किमान १० जणांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक लोक बेपत्ता असल्याची नोंद आहे.

बाबा वेंगा कोण आहेत?

बाबा वेंगा यांचा जन्म १९११ मध्ये बल्गेरिया येथे झाला. त्यांचे नाव वांगेलिया पांडेवा गुश्टेरोवा होते. वयाच्या १२ व्या वर्षी एका हिंसक वादळात त्यांची दृष्टी गेली. या घटनेनंतर त्यांना  भविष्य पाहण्याची शक्ती मिळाली असा दावा त्यांनी केला. अनेक प्रमुख जागतिक घटनांचे अचूक भाकित करून त्यांनी प्रसिद्धी मिळवली. त्यांचे निधन १९९६ मध्ये झाले, पण त्यांच्या भविष्यवाण्या अजूनही त्यांचे अनुयायी आणि इतर लोक प्रसारित करतात. काही लोक त्यांच्या विश्वासांवर शंका घेतात, तर काहींना त्याच्या अचूकतेबद्दल आश्चर्य वाटते. ९/११ चे दहशतवादी हल्ले, १९९७ मध्ये राजकुमारी डायनाचा मृत्यू आणि कोविड चा प्रसार यासारख्या त्यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. यामुळे त्यांनी केलेल्या भविष्यवाणीची जगभरात चर्चा होत असते.

Web Title: What does Baba Venga's prediction say about the India-Pakistan war? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.