बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:31 IST2025-08-14T12:30:40+5:302025-08-14T12:31:27+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडेन यांना कडक इशारा दिला आहे.

बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडेन यांना कडक इशारा दिला आहे. यासोबतच १ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकी देखील दिली आहे. हंटर बायडेन यांनी आपल्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध खोटी आणि बदनामीकारक वक्तव्ये केली आहेत, असा आरोप मेलानिया यांनी केला आहे.
"चॅनेल ५ विथ अँड्र्यू कॅलाघन" या यूट्यूब शोमधील अलिकडच्या मुलाखतीत हंटर बायडेन यांनी दावा केला की, जेफ्री एपस्टाईन यांनी मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली भेट घडवून आणली होती. हंटर यांचे हे विधान सोशल मीडिया आणि अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल झाले, ज्यामुळे मेलानिया यांची प्रतिमा खराब झाली.
मेलानिया यांनी दिली कायदेशीर कारवाई
मेलानियाच्या वतीने वकील अलेजांद्रो ब्रिटो यांनी ६ ऑगस्ट रोजी हंटर बायडेन आणि त्यांचे वकील अॅबी लोवेल यांना कायदेशीर नोटीस पाठवली. हंटर बायडेन यांनी त्यांचे विधान तात्काळ मागे घ्यावे, सार्वजनिकरित्या माफी मागावी आणि संबंधित व्हिडीओ काढून टाकावा, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. जर, असे केले नाही तर १ अब्ज डॉलर्सचा (सुमारे ८,३०० कोटी रुपये) मानहानीचा खटला दाखल केला जाईल.
ब्रिटो यांनी लिहिले की, "या खोट्या, बदनामीकारक आणि प्रक्षोभक विधानांमुळे मेलानिया ट्रम्प यांना मोठे आर्थिक आणि प्रतिष्ठेचे नुकसान झाले आहे. व्हिडीओ आणि त्यात केलेले दावे जगभरातील लाखो लोकांपर्यंत पोहोचले आहेत." ब्रिटो यांनी असाही आरोप केला की, हंटर यांच्या या माहितीचा स्रोत सीरियल फॅब्युलिस्ट मायकेल वुल्फ आहे. अमेरिकेत पुढील राष्ट्रपती निवडणुकीसाठी वातावरण तयार होत असताना हा वाद समोर आला आहे.