शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
2
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
3
डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 
4
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
5
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
6
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
7
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
8
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
9
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
10
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
11
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
12
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
13
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
14
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
15
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
16
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
17
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
18
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
19
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
20
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला विरोध केला तर आणखी १०% टॅरिफ लावू; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 10:25 IST

२०२४ मध्ये ब्रिक्सचा विस्तार करून इजिप्त, इथियोपिया, इराण आणि संयुक्त अरब आमिरात यांना, तर २०२५ मध्ये इंडोनेशियास सहभागी करून घेण्यात आले.

न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : ‘ब्रिक्स’ देशांच्या अमेरिकाविरोधी धोरणांना समर्थन देणाऱ्या देशांवर १० टक्के अतिरिक्त शुल्क लावण्याची धमकी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी दिली. 

ट्रम्प यांच्या शुल्क वाढीच्या निर्णयावर ब्रिक्स समूहाने ट्रम्प यांचे नाव न घेता टीका केली आहे. त्यामुळे चिडलेल्या ट्रम्प यांनी ही धमकी दिली आहे. ब्रिक्स समूहातील देशांची १७ वी शिखर परिषद ६ व ७ जुलै रोजी ब्राझीलमध्ये होत आहे.

ट्रम्प यांनी समाज माध्यम मंच ‘ट्रुथ सोशल’वर रविवारी जारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘‘ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांशी जोडल्या जाणाऱ्या देशांवर १० टक्के अतिरिक्त शुल्क लावले जाईल. याला कोणीही अपवाद राहणार नाही. याकडे लक्ष दिल्याबद्दल आपले धन्यवाद.” ज्ञात असावे की, ब्रिक्स समूहात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे मूळ ५ देश आहेत. २०२४ मध्ये ब्रिक्सचा विस्तार करून इजिप्त, इथियोपिया, इराण आणि संयुक्त अरब आमिरात यांना, तर २०२५ मध्ये इंडोनेशियास सहभागी करून घेण्यात आले.

आज जाहीर होऊ शकतो भारत-अमेरिका छोटा करारभारत आणि अमेरिका यांच्यातील छोटा व्यापार करार आज जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी सांगितले की, कराराचा सीमा शुल्क विषयक भाग आज जाहीर होऊ शकतो. इतर भाग नंतर जाहीर केला जाईल.

चीनने दिले स्पष्टीकरणट्रम्प यांनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी म्हटले की, ब्रिक्स ही संघटना संघर्षासाठी नाही तसेच ती कोणत्याही अन्य देशास लक्ष्य करीत नाही. उगवत्या बाजारपेठा आणि विकसनशील देशातील समन्वयासाठी ब्रिक्स महत्त्वपूर्ण मंच आहे.

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारत