संपूर्ण इराण उद्ध्वस्त करू! ट्रम्प यांचा जी-७ बैठकीत इशारा; लवकरच शरणागती पत्करेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 05:49 IST2026-03-14T05:49:25+5:302026-03-14T05:49:50+5:30

इस्रायलीने केलेल्या हवाई हल्ल्यांत लेबनॉनमध्ये १०० हून अधिक मुलांचा मृत्यू

We will destroy all of Iran! Trump's warning at the G-7 meeting; Will surrender soon | संपूर्ण इराण उद्ध्वस्त करू! ट्रम्प यांचा जी-७ बैठकीत इशारा; लवकरच शरणागती पत्करेल

संपूर्ण इराण उद्ध्वस्त करू! ट्रम्प यांचा जी-७ बैठकीत इशारा; लवकरच शरणागती पत्करेल

दुबई : इराणवर एवढे हल्ले करू की, तो देश उद्ध्वस्त होईल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. इराण लवकरच शरणागती पत्कारेल, असा दावाही त्यांनी जी-७ देशांच्या ऑनलाइन बैठकीत केला. 

गेल्या ४७ वर्षांत त्यांनी जगभर निरपराध लोकांना ठार केले, त्यांना अमेरिकेचा ४७वा राष्ट्राध्यक्ष म्हणून मी संपवत आहे. मी सर्वांना धोकादायक ठरत असलेल्या 'कॅन्सर'चा नायनाट केला आहे.  ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ या लष्करी मोहिमेत अमेरिकेला मोठे यश मिळाल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी इराणचे तथाकथित नवे सर्वोच्च नेते जखमी झाले असून त्यांचा चेहरा विद्रूप झाला असण्याची शक्यता असल्याचे सांगितले. तेहरानमध्ये पॅलेस्टिनी समर्थनार्थ आयोजित ‘कुद्स डे’ निदर्शनांच्या परिसरात शुक्रवारी मोठा स्फोट झाला. हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले होते. यात एका महिलेचा मृत्यू झाला. 

इस्रायल व हिजबुल्ला यांच्यात सुरू असलेल्या ताज्या संघर्षात लेबनॉनमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला असल्याची माहिती लेबनॉनने दिली आहे. इराणने भारतीय ध्वज असलेल्या २ एलपीजी वाहतूक जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे.

होर्मुझच्या पश्चिमेला २४ भारतीय जहाजे 

विशेष सचिव राजेशकुमार सिन्हा यांनी सांगितले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेकडील २४ जहाजांवर ६७७ खलाशी आहेत तर पूर्वेकडील इतर जहाजांवर ७६ खलाशी आहेत. भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फथाली यांनी संकेत दिले की, भारत आमचा मित्र असून, होर्मुझ सामुद्रधुनीतून भारताला सुरक्षित मार्ग दिला जाईल. 

तीन भारतीय खलाशांचा  मृत्यू; चार जण जखमी 

युद्धात आतापर्यंत तीन भारतीय खलाशांचा मृत्यू तर चार जण जखमी झाले. एक खलाशी बेपत्ता आहे.  मृतांमध्ये बिहार आणि राजस्थान येथील रहिवासी असलेले आशिष कुमार, दलीप सिंग यांचा समावेश असून मुंबईचा दीक्षित सोलंकी हा बेपत्ता आहे. 

सेफ सी विष्णू या तेलाच्या टँकरवर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी मंत्रालयाने दिली आहे.

Web Title : ट्रंप की चेतावनी: ईरान होगा तबाह, जल्द करेगा आत्मसमर्पण

Web Summary : ट्रंप ने ईरान को तबाह करने की धमकी दी और जल्द आत्मसमर्पण का दावा किया। बढ़ते तनाव के बीच, तेहरान में विस्फोट और लेबनान में इजरायली हमलों में हताहत हुए। भारतीय जहाजों को सुरक्षित मार्ग मिला, पर तीन भारतीय नाविकों की मौत हो गई।

Web Title : Trump Warns of Iran's Destruction; Predicts Imminent Surrender

Web Summary : Trump threatened to devastate Iran, claiming its surrender is near. Amid escalating tensions, a Tehran explosion and Israeli strikes in Lebanon caused casualties. Indian ships received safe passage, but three Indian sailors died in the conflict.