'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 07:27 IST2025-07-22T07:25:48+5:302025-07-22T07:27:32+5:30
इराणने अणुकार्यक्रम सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता इस्त्रायल आणि अमेरिका पुन्हा एकदा इराणवर हल्ले करु शकतात.

'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
इराणने आपला अणुकार्यक्रम सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. 'इस्रायली आणि अमेरिकन हल्ल्यांमुळे इराणच्या अणुस्थळांचे नुकसान झाले आहे, पण आम्ही आमचा अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार असल्याचे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची म्हणाले.
"इराण जे काही नवीन अणुसुत्र बांधण्याचा निर्णय घेईल ते नष्ट केले जातील. जूनमध्ये झालेल्या अमेरिकेच्या हल्ल्यात तीन अणुसुत्र पूर्णपणे नष्ट झाले. त्यांना पुन्हा सेवेत आणण्यासाठी अनेक वर्षे लागतील", असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
इराण युरोपीय देशांशी चर्चा करणार
'या आठवड्यात युरोपीय देशांसोबत त्यांच्या अणुकार्यक्रमावर नवीन चर्चा करतील, याचे आयोजन तुर्कीये करणार आहेत. या चर्चेत इराणी अधिकारी ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीच्या अधिकाऱ्यांशी भेटतील. युरोपियन युनियनच्या परराष्ट्र धोरण प्रमुख काजा कल्लास देखील या बैठकीला उपस्थित राहतील',अशी माहिती त्यांनी दिली.
"चर्चेचा विषय स्पष्ट आहे. निर्बंध उठवणे आणि इराणच्या शांततापूर्ण अणु कार्यक्रमाशी संबंधित मुद्दे," असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघाई यांनी त्यांच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला
इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या जवळ आहे. इस्रायलला भीती आहे की इराण त्याच्या अणुशस्त्रांचा वापर करून ते नष्ट करेल. १३ जून रोजी इस्रायलने इराणवर हल्ला केला. त्यानंतर इराणनेही इस्रायलवर हल्ला केला.
दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या लष्करी संघर्षात अमेरिकेनेही प्रवेश केला. अमेरिकेने इराणच्या तीन महत्त्वाच्या अणु तळांवर हल्ला केला. इस्रायल आणि इराणमधील लष्करी संघर्ष १२ दिवस चालला.