Pakistan PM Shahbaz Sharif: भारताला आम्ही ६ धमाक्यांनी गुडघे टेकायला भाग पाडलेले; शाहबाज शरीफांनी गरळ ओकलीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 19:52 IST2022-04-11T19:51:44+5:302022-04-11T19:52:44+5:30
Pakistan PM Shahbaz Sharif on India: शाहबाज शरीफ यांनी सत्तेवर येताच मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पेन्शनमध्ये 10% वाढीची घोषणा केली आहे. यासोबतच किमान वेतन दर २५ हजार रुपये ठेवण्यात आला आहे.

Pakistan PM Shahbaz Sharif: भारताला आम्ही ६ धमाक्यांनी गुडघे टेकायला भाग पाडलेले; शाहबाज शरीफांनी गरळ ओकलीच
पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाज शरीफांनी शपथ घेण्यााधीच भारताविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. भारताला आम्ही एका मागोमाग एक अशा सहा अणुबॉम्बच्या चाचण्यांनी गुडघे टेकायला भाग पाडलेले, काश्मीर मुद्द्यावर काश्मीरींच्या बाजुने चर्चा व्हायला हवी असे वक्तव्य केले आहे.
शाहबाज शरीफ हे रात्री ८ वाजता पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी पाकिस्तानी संसदेत भारताविरोधात भाषण केले. यामध्ये त्यांनी काश्मीरवरून वक्तव्य केले आहे. काश्मीरमधील ३७० कलम जेव्हा हटविण्यात आले तेव्हा पाकिस्तानच्या तत्कालीन सरकारने कारवाई केली नाही, असे ते म्हणाले.
पाकिस्तानने याच भारताला गुडघे टेकायला भाग पाडलेले. आम्ही एका मागोमाग एक अशा सहा अणुबॉम्बच्या चाचण्या घेतलेल्या. आम्ही काश्मीरींना त्यांच्या परिस्थितीवर असेच सोडणार नाही. त्यांना यापुढेही पाठिंबा देत राहू, असे वक्तव्य केले आहे. परकीय षड्यंत्राच्या प्रकरणात माझा सहभाग असल्याचा काही पुरावा मिळाल्यास मी अल्लाला साक्षी मानून पदाचा राजीनामा देईन, असे ते म्हणाले. शाहबाज शरीफ यांनी सत्तेवर येताच मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पेन्शनमध्ये 10% वाढीची घोषणा केली आहे. यासोबतच किमान वेतन दर २५ हजार रुपये ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांनी तब्येत बिघडल्याचे म्हटले आहे. यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते रजेवर गेले आहेत. यामुळे अल्वी शाहबाज यांना शपथ देणार नाहीत. तर सिनेटचे अध्यक्ष सादिक संजरानी शाहबाज यांना शपथ देतील.