'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 09:07 IST2025-05-02T09:05:48+5:302025-05-02T09:07:19+5:30
Bilawal Bhuttoo India Pakistan News: पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी पुन्हा एकदा सिंधू जल करारावरून भारतावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत भुत्तोंनी युद्धाची भाषा केली आहे.

'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
India Pakistan News: 'सिंधू आमची आहे, आमचीच राहणार. सिंधू नदीतून आमचे पाहणी वाहिले नाही, तर भारतीयांचे रक्त वाहणार', असे विधान करणारे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी पुन्हा एकदा युद्धाची भाषा करत गरळ ओकली आहे. पंतप्रधान मोदींनी आता सिंधूवर हल्ला केला आहे, असे भुत्तो म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या मिरपूरखास येथे बिलावल भुत्तो यांची सभा झाली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा सिंधू जल कराराचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर टीका केली.
मोदींनी सिंधू नदीवर हल्ला केलाय
बिलावल भुत्तो एका सभेत बोलताना म्हणाले, "आम्हाला युद्ध नकोय, पण ते जर सिंधूवर हल्ला करत असतील, तर त्यांना माहिती आहे की, सिंधूतून पाणी वाहणार किंवा रक्त. पंतप्रधान मोदींनी आता सिंधूवर हल्ला केला आहे. आणि आवाहन करतो की, आपण ज्या प्रकारे देशात सिंधूच्या पाण्याबद्दल उठवतो. त्याचप्रमाणे आपण आता एकजूट होऊयात. मग ते कोणत्याही पक्षाचे असोत."
वाचा >>...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
"आपण सिंधू मोदींच्या धोक्यापासून दूर बाहेर काढू. मी २७ डिसेंबर रोजी म्हटलं होतं की, मी जेव्हा तुमचा मंत्री होतो, तेव्हापासून सिंधूची बाजू मांडत आलोय. मी याच सिंधू जल कराराचा उल्लेख करत होतो. तेव्हाही भारताने प्रयत्न केले आणि आज काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी घोषणा केली आहे की, ते सिंधू जल करार मान्य करत नाही. आम्ही त्यांचा हा निर्णयच मान्य करत नाही", असे बिलावल भुत्तो म्हणाले.