'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:41 IST2025-11-13T13:40:07+5:302025-11-13T13:41:46+5:30
तुर्की त्यांच्या स्थानामुळे दहशतवाद्यांसाठी दीर्घकाळापासून अनुकूल ठिकाण मानले जात आहे. या देशाला "सीरियाचा मागचा दरवाजा" म्हणूनही ओळखले जाते. डॉक्टर मुजामिल आणि डॉक्टर उमर यांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या नेटवर्कद्वारे तुर्कीला प्रवास केल्याचा संशय सुरक्षा एजन्सींना आहे.

'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
सोमवारी दिल्लीत लाल किल्ल्यासमोर झालेल्या स्फोटाचा तपास सुरू आहे. सुरक्षा एजन्सींना अनेक पुरावे मिळाले आहेत. स्फोटापूर्वी डॉ. उमर आणि डॉ. मुझम्मिल याने तुर्कीयेला भेट दिली होती का? त्यांनी तिथे दहशतवादी छावणीत भाग घेतला होता का? याची चौकशी सुरू आहे. तुर्की हा असा देश आहे तिथे यापूर्वी दहशतवादी कारवाया झाल्या आहेत. त्यामुळे या देशाचे नाव घेतल्याने प्रश्न निर्माण होतात. एजन्सींनी अद्याप या प्रकरणावर कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. पण, मीडिया रिपोर्ट्समध्ये नावे समोर आल्यानंतर तुर्कीने प्रतिक्रिया दिली आहे. तुर्की देशाने हे खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानची अफगाणिस्तान अन् भारताला पोकळ धमकी; एकाचवेळी युद्ध करण्याची क्षमता आहे किती?
तुर्कीच्या दळणवळण संचालनालयाने या प्रकरणावर अधिकृत निवेदन जारी केले. निवेदनात म्हटले आहे की, तुर्कीये भारतातील दहशतवादी कारवायांशी जोडलेले आहेत आणि दहशतवादी गटांना लष्करी, राजनैतिक आणि आर्थिक मदत पुरवतात असा दावा करणारे मीडिया रिपोर्ट्स हे आपल्या द्विपक्षीय संबंधांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने केलेल्या दुर्भावनापूर्ण आणि खोट्या मोहिमेचा भाग आहेत.
तुर्की भारत किंवा इतर कोणत्याही देशाला लक्ष्य करणाऱ्या "कट्टरपंथी कारवायांमध्ये" कोणत्याही प्रकारे, कोणत्याही स्वरूपात सहभागी नाही. हे दावे पूर्णपणे दिशाभूल करणारे आहेत आणि त्यांना कोणताही तथ्यात्मक आधार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
डॉक्टर उमर आणि मुझम्मिल यांचा तुर्की दौरा
डॉक्टर उमर आणि मुझम्मिल यांच्या तुर्की दौऱ्याबाबत अनेक तथ्ये समोर आली आहेत. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या नेटवर्कने डॉ. मुझम्मिल आणि डॉ. उमर यांच्या तुर्की दौऱ्याला मदत केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. दोन्ही डॉक्टर टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या अॅप्सचा वापर करत होते. त्यांना मेसेजिंग अॅप ग्रुपमध्ये सूचना मिळाल्या आणि त्यानंतर ते तुर्कीला गेले. या सूचनांचे तपशील अद्याप उघड झालेले नाहीत,असे सूत्रांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.